राहुरी/कोपरगाव : अहमदनगर जिल्ह्यात आज वादळी वा-यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला.राहुरी तालुक्यातील काही भागात आज वादळी वा-यासह हलक्या पावसाने हजेरी लावली. ब्राम्हणी परिसरात वादळी वा-यासह रिमझिम पाऊस झाला. कोपरगाव तालुक्यात दहिगाव बोलका परिसरात जोराचा पाऊस झाला. जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे.
जिल्ह्यात वादळी वा-यासह हलक्या पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 4:28 PM