लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : येथील गुलमोहर रोड परिसरातील सावली सोसायटीत शनिवारी रात्री नऊच्या सुमारास वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला. वीज पडल्याने परिसरातील नागरिकांच्या घरातील विद्युत साहित्य जळून खाक झाले. कुठलीही जीवित हानी झाली नाही.
शहर व परिसरात शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. आकाशात काळे ढग दाटून आले. विजेचा लखलखाट सुरू होता. सावेडी उपनगरातील गुलमोहर रोडवरील सावली सोसायटीत अचानक मोठा अवाज झाला. वीज नारळाच्या झाडावर पडून नाराळाच्या झाडाने पेट घेतला. दरम्यान, माजी नगरसेवक निखिल वारे यांनी तातडीने महावितरणच्या अधिकऱ्यांशी संपर्क साधला. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा खंडित केल्याने पुढील अनर्थ टळला. वीज पडल्यामुळे या भागातील नागरिकांचे दूरध्वनी संच जळाले असून, काहींच्या घरातील विद्युत मीटरही जळाले आहे.
..