अहगदनगर - अधिक मासनिमित्त शहरातील सावेडी परिसरातील रासने नगर येथील श्री शक्तिधाम नवग्रह, नागेश्वर मंदिरात लिंगार्चन सोहळ्याचा शनिवारी समारोप करण्यात आला.
गेल्या १८ दिवसापासून हा सोहळा ऑनलाईन सुरु होता. या सोहळ्यात पंचावन्न शिवलिंग पूजन व सहस्त्र नामावली मंत्रपठण घरोघरी करण्यात आले. मंदिरात शुक्रवारी पूर्णाहुती व भंडारा अंतरपथ्याचे नियम पाळून करण्यात आला. यावेळी आद्य गुरु शंकराचार्यांचे शिष्य श्री.गदाधर महाराज यांनी भक्तांना मार्गदर्शन केले. अधिक मासाचे महत्व त्यांनी सांगितले.
यावेळी महाराजांचे परम शिष्य स्व.मधुकर मालवे यांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात विश्वहिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री गजेंद्र सोनवणे, मठमंदिर समितीचे प्रमुख हरिभाऊ डोळसे, राजेश सटाणकर, बाबासाहेब गारडे, विठ्ठल भांड, श्रीमती मंदाकिनी मालवे, सुरेंद्र मालवे, अनिल मालवे, स्मिता मालवे, श्रवण मालवे, श्रेयश मालवे, श्रुती मालवे, आकाश बेलेकर, मनीषा सोनवणे, हिरा बाविस्कर आदी उपस्थित होते.