शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)
7
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
8
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
9
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
10
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
11
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
12
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
13
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
14
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
15
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
16
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
17
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
18
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
19
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?

श्रीरामपूर शहरातील दारूचे दुकाने खुली; दुकानांसमोर रांगा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 4:54 PM

प्रशासनाबरोबर पंधरा दिवसांमध्ये तब्बल चार बैैठका पार पडल्यानंतर शहरातील दुकाने टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास हिरवा कंदिल मिळाला. बुधवारी शहरातील प्रतिबंधित व्यवसाय वगळून इतर दुकाने खुली झाली. दारूची दुकाने उघडल्याने मोठ्या रांगा लागल्या. 

श्रीरामपूर : प्रशासनाबरोबर पंधरा दिवसांमध्ये तब्बल चार बैैठका पार पडल्यानंतर शहरातील दुकाने टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास हिरवा कंदिल मिळाला. बुधवारी शहरातील प्रतिबंधित व्यवसाय वगळून इतर दुकाने खुली झाली. दारूची दुकाने उघडल्याने मोठ्या रांगा लागल्या. दीड महिन्याच्या लॉकडाऊनंतर व्यापाºयांना दिसाला मिळाला. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार लहू कानडे, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींची प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या उपस्थितीत वेळोवेळी बैैठका घडवून आणल्या. उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले. मंत्री थोरात यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रांताधिकारी पवार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. त्यानंतर प्रांताधिकाºयांनी मुख्याधिकारी समीर शेख यांना दुकाने सुरू करण्याचे आदेश दिले. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विशाल फोफळे, उपाध्यक्ष उमेश अग्रवाल, सचिव अमेय ओझा व सचिव अमोल कोते तसेच संचालक मंडळाने दुकाने खुली करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. शहरातील हॉटेल, सलून, ब्युटी पार्लर, पान स्टॉल, चहाचे हॉटेल, रसवंती, शीतपेये, भेळ, वडापावची दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहेत. जीवनावश्यक वस्तू व कृषी पूरक दुकाने पूर्वीप्रमाणेच खुली राहणार आहेत. दुकाने सुरू करताना सोशल डिस्टन्स, मास्कचा व सॅनिटायझरचा वापर या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी पथकासमवेत दुकानांची पाहणी करीत उपाययोजनांची पाहणी केली. एका बाजूची दुकाने आठवड्यातून प्रत्येकी तीन दिवस तर उर्वरीत दुकाने तीन दिवस खुली राहणार आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर