संगमनेर : लॉकडाऊनच्या तिस-या टप्प्यात संगमनेर शहरातील कोल्हार-घोटी राज्य महामार्ग, कॉलेज रस्ता, पुणे-नाशिक महामार्ग, सय्यद बाबा चौक या प्रतिबंधित केलेल्या भागात केवळ जीवनावश्यक वस्तुंची दुकाने उघडी राहतील, असे प्रशासनाचे आदेश होते. परंतु याच भागात दारूची दुकाने मंगळवारी उघडण्यात आली होती. लॉकडाऊन संचारबंदी असताना देखील दारूची दुकाने उघडल्याने फिजीकल डिस्टन्सिगचे सर्वच नियम पायदळी तुडवित दारू खरेदी करण्यासाठी नागरिकांच्या लांबवर रांगा लागल्या होत्या. दारूच्या दुकानांसमोरील रांगामुळे प्रशासन, पोलिसांची मोठी धावपळ उडाली होती. यानंतर मात्र प्रतिबंधित क्षेत्रात असलेली दारू दुकाने प्रशासनाने दुपारी एक वाजेच्या सुमारास बंद केली आहेत.
संगमनेरात प्रतिबंधित भागात उघडली दारूची दुकाने; प्रशासनाची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2020 2:54 PM