शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
2
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
3
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
4
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
5
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
6
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
7
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
8
Laxmi Pujan 2024: लक्ष्मीपूजेत केरसुणीची पूजा केल्यावर लक्षात ठेवा 'हे' नियम; अन्यथा पूजा जाईल व्यर्थ!
9
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
10
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
11
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
12
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
13
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
14
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
15
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
16
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
17
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
18
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
19
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
20
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल

कोल्हारमधील सराफास लुटले, तेरा लाखांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 5:47 PM

दुकान उघडणाऱ्या सराफ व्यावसायिकास कुलूप उघडण्यात गुंतवून काउंटरच्या आतील बाजूस ठेवलेले सोने-चांदीचे अलंकार व रोकड असा सुमारे तेरा लाख रूपयांचा ऐवज असलेली बॅग शुक्रवारी आठवडे बाजारच्या दिवशी चोरट्यांनी लंपास केली.

कोल्हार(राहुरी) : दुकान उघडणाऱ्या सराफ व्यावसायिकास कुलूप उघडण्यात गुंतवून काउंटरच्या आतील बाजूस ठेवलेले सोने-चांदीचे अलंकार व रोकड असा सुमारे तेरा लाख रूपयांचा ऐवज असलेली बॅग शुक्रवारी आठवडे बाजारच्या दिवशी चोरट्यांनी लंपास केली.

कोल्हार येथील माधवराव खर्डे चौकातील कापड बाजारात सुभाष सुपेकर यांचे सुपेकर ज्वेलर्स हे सराफी दुकान आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे सुपेकर दुकान उघडण्यासाठी आले. दुकानाच्या दोन शटरपैकी पहिले शटर सुपेकरांनी उघडले. दुसºया शटरचे कुलूप उघडत असताना त्यात चिकट द्रवपदार्थ व त्यात काड्या खोचलेल्या आढळल्या. कुलूप उघडण्याच्या प्रयत्नात त्यांचा वेळ गेला. दरम्यान दुकानाबाहेर मोटार सायकलवर पाळत ठेवून उभे असलेल्या दोघांपैकी एकाने संधी साधून काउंटरच्या आतील बाजूस ठेवलेली सोन्या चांदीचा ऐवज असलेली बॅग घेऊन पलायन केले. बॅग घेऊन हा चोरटा बाजारपेठेच्या पूर्वेस असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरजवळ गेला. त्यानंतर पाठीमागून मोटर सायकलवर आलेल्या दुसरा साथीदारासह पलायन केले. दरम्यान शटर उघडून दुकानात प्रवेश केल्यानंतर सुपेकरांना बॅग गायब झाल्याचे आढळले.चोरट्यांनी लंपास केलेल्या बॅगेत सुमारे ११ लाख रूपये किंमतीचे ३४ तोळे सोन्याचे दागिने, दीड लाख रूपये किंमतीचे साडेचार किलो चांदीचे दागिने व ४२ हजार रूपयांची रोकड असा एकूण तेरा लाख रूपयांचा ऐवज होता. लोणी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रणजीत गलांडे यांनी तपासाची चक्रे फिरवून आसपासच्या दुकानातील सीसीटीव्हीचे फुटेज तसेच विठ्ठल मंदिरासमोरील फुटेज तपासले. त्यात घटनाक्रम व चोरट्यांच्या हालचाली दिसून आल्या. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फौजदार भालचंद्र शिंदे तपास करीत आहेत.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी