अहमदनगर : जिल्हा परिषदेने अनुकंपाधारकांना नोकरी देण्याची प्रक्रिया सुरू केली असून, सेवाज्येष्ठता यादी लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपाधारकांना दिलासा मिळणार आहे.जिल्हा परिषदेने यापूर्वी केलेल्या अनुकंपा भरतीची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी सुरू आहे. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाकडे अनुकंपाधारकांचे २५० अर्ज नोकरीसाठी प्राप्त झाले होते. त्यापैकी ६५ जणांना नोकरी मिळाली असून, अपात्र अर्जांची संख्या ४५ इतकी आहे. उर्वरित २४० अनुकंपाधारकांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यादी प्रसिद्ध करताना ज्यांनी कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. अर्ज परिपूर्ण आहे, अशा व्यक्तींचा ज्येष्ठता यादीतील वरच्या क्रमांकावर समावेश असणार आहे. कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्यांचा समावेश सर्वांत शेवटी असणार आहे. ज्येष्ठता यादीतील वरच्या क्रमांकावर असणाºयांना जिल्हा परिषदेतील रिक्त जागांवर नियुक्ती जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्हा परिषदेत अनुकंपाभरतीचा तिढा गेल्या अनेक वर्षांपासूनचा आहे़ अनुकंपाधारक अर्ज दाखल करतात़ परंतु, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करत नाहीत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. परंतु, प्रशासनाकडूनही तसे प्रयत्न केले जात नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे पायपीट करूनही नोकरी मिळत नाही़ अनेकांची तर वयाची मर्यादा संपुष्टात येते. पण, नोकरी मिळत नसल्याचे प्रकार जिल्हा परिषदेत यापूर्वी घडलेले आहेत. त्यामुळे आगामी अनुकंपा भरती पारदर्शकपणे करण्याचा सामान्य प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.हरकतींसाठी पंधरा दिवसच्कागदपत्रांची पूर्तता करणा-यांची ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीवर हरकती नोंदविण्यासाठी १५ दिवसांची मदत असणार आहे. मुदतीत प्राप्त झालेल्या हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
२४० अनुकंपाधारकांची ज्येष्ठता यादी लवकरच : साडेतीनशे अर्ज प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:23 PM