सानप यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली. ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू केल्यानंतरच या निवडणुका घेतल्यास वंचित समाजाला न्याय मिळेल, असे सांगून त्यांनी इतर मागासवर्गीयांना आरक्षणाची गरज आहे, याची जाणीव करून दिली. लोकजागृतीमुळे अलीकडे वंचित ओबीसी समाज आरक्षणाचा लाभ घेण्यास सुरुवात झाली असताना हे आरक्षण काढून घेण्यात आले. ओबीसी समाजात अनेक छोटे-छोटे समाज आहेत. त्यांना मूळ प्रवाहात येण्यास या आरक्षणाचा उपयोग होणार आहे. म्हणून ओबीसी आरक्षणाचा हक्क अबाधित रहावा, अशी अपेक्षा सानप यांनी व्यक्त केली. यावेळी सानप यांनी ट्रक वाहतूकदारांचे प्रश्न सोडविण्याचीही मागणी केली.
फोटो २८ सानप
ओळी-सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब सानप यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशी मागणी केली.