श्रीगोंदा : कोरोनामुळे सध्या शाळांना सुटी आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी श्रीगोंदा येथील महादजी शिंदे विद्यालयाचे प्राचार्य तुकाराम कन्हेरकर यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.
महादजी शिंदे विद्यालयात सध्या १ हजार ८०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एकूण ३२ वर्ग आहेत. शिक्षकांनी प्रत्येक वर्गाचे व्हाट्सअँप ग्रुप बनवले आहेत. शिक्षक वेगवेगळ्या व्हिडिओज, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन यांचा प्रभावी वापर करत आहेत. वर्षभरातील कामकाजाचे मूल्यमापन करण्यात आले. विद्यार्थ्यांना कुठलेही अभ्यासाचे दडपण न देता शब्द कोडी, गणिती सूत्रे, ऐतिहासिक सनावळ्या, वैज्ञानिक याबाबत आनंददायी पद्धतीने वाटतील अशा प्रश्नपत्रिका व कृतीपत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन शिक्षणातून अध्ययन-अध्यापन व मूल्यमापन पद्धतीचा कल्पना, प्रत्यक्षात निर्मीती ,नियोजन अंमलबजावणी करण्यासाठी विद्यालयाचे उपप्राचार्य बाळासाहेब जाधव, पर्यवेक्षक उत्तम बुधवंत, गुणवत्ता कक्ष प्रमुख सुधीर साबळे, गुरुकुलप्रमुख विलास लबडे, ज्येष्ठ शिक्षक विलास दरेकर यांनी नियोजन केले आहे.