शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगे-उदय सामंतांची पुन्हा भेट! राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण; सामंत म्हणाले...
2
वरळीतून मिलिंद देवरांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; "आम्हाला स्थानिकच आमदार हवा..." चा नारा
3
उद्धव ठाकरे गटाची दुसरी यादी आली; कणकवलीत नितेश राणेंविरोधात 'शॉकिंग' उमेदवार
4
"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."
5
Jio युजर्सना दिवाळी गिफ्ट! 3350 रुपयांचा मोफत लाभ, जाणून घ्या सविस्तर...
6
Test Record : घरच्या मैदानात ३००+ धावांचा पाठलाग करताना कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
7
केवळ १५ वर्षांत बनाल Millionaire, हा फॉर्म्युला वापरा; २५ व्या वर्षी गुंतवणूक कराल तर, ४० व्या वर्षी व्हाल मालामाल
8
इराणवरच नाही, तर इस्रायलचा इराकवरही हल्ला; एअर डिफेन्स सिस्टिम उडविल्या, कारण काय? 
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला,अनेक शहरांवर बॉम्बवर्षाव, इराण प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
10
"१९६७ ला माझ्या बापाने बंडखोरी केली, आमदार झाले; आम्ही काय बंडखोरीच करायची का..?"
11
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
12
'आमी जे तोमार'वर नृत्य करताना स्टेजवर कोसळली विद्या बालन, पुढे घडलं असं काही की सर्वांनी केलं कौतुक
13
Diwali Astro 2024: ही दिवाळी अडलेल्या कामांना गती आणि प्रगती देणारी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
14
५ ग्रह गोचराने अद्भूत योग: ८ राशींचा भाग्योदय, सुख-समृद्धी; धनलाभ, लक्ष्मी-नारायण शुभ करतील!
15
जान्हवी बिग बॉसमध्ये वापरलेल्या १०० कपड्यांचा लिलाव करणार? अभिनेत्रीने खरं काय ते सांगितलंच! म्हणाली-
16
ना ओटीपी, ना पिन, केवळ Aadhaar नंबरद्वारे झटपट काढता येतील पैसे; सोपी आहे पद्धत
17
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
18
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
19
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
20
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!

आटलेला तलाव : भीषण दुष्काळामुळे भुतवडा तलाव कोरडाठाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 10:53 AM

शहराला व चार वाड्यावस्त्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी वरदान वरदान ठरलेला भुतवडा तलाव कोरडाठाक पडला आहे. ४१ वर्षापूर्वी तयार झालेला तलाव मागील पंधरा वर्षात चार वेळा आटला आहे.

अशोक निमोणकरजामखेड : शहराला व चार वाड्यावस्त्यांना पिण्यासाठी व शेतीसाठी वरदान वरदान ठरलेला भुतवडा तलाव कोरडाठाक पडला आहे. ४१ वर्षापूर्वी तयार झालेला तलाव मागील पंधरा वर्षात चार वेळा आटला आहे. त्यामुळे शहराला टॅँकरने पाणी पुरवठा करण्याचा वेळ आली आहे.या तलावातून ग्रॅव्हिटीने (वीजपुरवठा अभावी थेट) पिण्यासाठी पाणीपुरवठा करणारी राज्यातील दुसरी योजना आहे. तलाव कोरडाठाक पडल्यामुळे गाळ काढण्याचा प्रयत्न दोन वेळा केला गेला. यावेळी मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. शहराच्या दक्षिणेला असलेल्या डोंगरदऱ्याच्या पायथ्याशी १९ आॅक्टोबर १९७० साली विंचरणा नदीवर भुतवडा तलाव बांधण्यास सुरुवात झाली. या तलावात सौताडा, मुगगाव, भवरवाडी येथील पडणारे पावसाचे पाणी येईल, अशा दृष्टीने नियोजन केले होते. ३०५ मीटर लांब, २५० मीटर रूंद, ३० मीटर खोल व ११९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होणाºया तलावाचे काम सुरू झाले. या तलावातून जामखेड शहर, आसपासच्या लेहनवाडी, रेडेवाडी, हापटेवाडी व भुतवडा गाव यांना पिण्यासाठी पाणीपुरवठा व ७३४ हेक्टर क्षेत्र बारमाही ओलिताखाली येईल अशा नियोजनातून १०.८० कि. मी. लांबीचा कालवा काढण्यात आला. १९७८ साली या तलावाचे काम पूर्ण झाले. तलाव पूर्ण क्षमतेने भरून शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात आला होता.या तलावामुळे जामखेड शहर व चार वाड्यावस्त्यासाठी शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटल्याने जामखेड शहराबाहेर व शहरात असलेला नोकरीला असणारा वर्ग जामखेड येथे स्थिरावू लागला. चार जिल्ह्याच्या सीमेवर जामखेड शहर हे मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे व पिण्यासाठी मुबलक पाणीपुरवठा होत असल्याने व्यापार वाढू लागला. भुतवडा तलाव उंचीवर असल्याने ग्रॅव्हिटीने थेट पाणीपुरवठा पूर्ण दाबाने येत असल्याने १५ ते २० मीटर नळाने पाणी मिळत असे. दिवसातून दोन वेळा पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जात असे. त्यामुळे साहजिकच भुतवडा तलाव जामखेड शहरासाठी वरदान ठरला आहे . यामुळे कोणीही जामखेडला राहण्यासाठी पसंती देत होते. सन १९९५ पासून शहराची वाढती लोकसंख्या व वाढता विस्तार पाहता दोन वेळ होणारा पाणीपुरवठा एकवेळ तर शेतीला कालव्याद्वारे येणारे पाणी कमी झाले. तरीही शहराचा विस्तार चार ते कि. मी.पर्यंत वाढतच गेला.परंतु तलाव ते जलशुद्धीकरण जलवाहिनी व शहरातील पाणीपुरवठा करणारी योजना अद्याप तीच असून ती जीर्ण झाली आहे.पंधरा हजार लोकसंख्या व शेतीला पाणीपुरवठा या हेतूने निर्माण झालेल्या तलावाला २५ वर्षानंतर ग्रहण लागण्यास सुरवात झाली. २००३ साली अल्प पाऊस झाला. यामुळे तलावात थोडेफार पाणी आले.शेती व पिण्याच्या पाण्यामुळे तलाव २००३ ला डिसेंबर अखेर कोरडाठाक पडला. या कोरडाठाक पडलेल्या तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ असल्याने पाण्याची साठवण क्षमता कमी झाली होती. त्यावेळी गाळ काढण्याचे थोडेफार प्रयत्न झाले. त्यानंतर २००८, २०१४, २०१६ तलाव कोरडाठाक पडला होता. मात्र २०१६ साली माजी महसूल मंत्री सुरेश धस यांच्या प्रयत्नातून व जामखेड नागरिकांच्या वतीने तलावातून गाळ काढण्यास सुरुवात केली. यामुळे अनेक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्तींनी मदत करून उत्स्फूर्तपणे तलावातील गाळ काढला गेला.भुतवडा तलावातील गाळ लोक सहभागातून काढला गेला. परंतु अद्याप तलावातील गाळ काढण्यासाठी पुन्हा प्रयत्न होणे आवश्यक आहे.-रामभाऊ ढेपे, शाखा अभियंता, लघुपाटबंधारे विभाग

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड