अहमदनगर : निवडणुका हे एक प्रकारचं युध्द समजलं जातं़ दोन मोठी कुटुंब लढणार आणि युध्द होणार, यासारख्या चर्चाही होत असतात. त्या स्वाभाविक आहेत़ पण मला अशा युध्दात कधीच रस वाटला नाही. सध्या तरी राजकारणात पडणार नाही, असे स्पष्ट करत आपण लोकसभा लढविणार नसल्याचे मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी बुधवारी जाहीर केले.नगर लोकसभा मतदारसंघातून गडाख यांचे नाव राष्टÑवादीकडून चर्चेत होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रसिद्धी पत्रक काढून निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले. पत्रकात त्यांनी म्हटले आहे, मी लोकसभेचा उमेदवार असल्याची चर्चा सुरु आहे़ माझे वडील तथा ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख व माझ्यासारख्या छोट्याशा व्यक्तीवर समाजाचे प्रेम आहे याची जाणीव यातून झाली़ कुटुंबातील प्रत्येकाने मी लढावे हे सांगितले.राजकारण हे चांगले की वाईट क्षेत्र, यावर खूप चर्चा होऊ शकते़ पण मला हे निश्चितच जाणवले की हे क्षेत्र खूपच असंवेदनशील झाले आहे. मग मी त्यात का पडावे, हे मानसिक द्वंद सुरु आहे. मला माझे मित्र, सर्व पक्ष, संघटना, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य समाज या सर्वांकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह झाला. पण मी सध्या तरी राजकारणात न पडण्याचा निर्णय घेतला आहे. पराभव व विजय याचा मी कधीच विचार केला नाही. कारण पराभव व विजय हा नवनिर्मितीचा असला पाहिजे, असे माझे मत आहे. मनातल्या वैचारिक घुसळणीतून संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यासाठी एक ‘व्हिजन’ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यात शेती, पिण्याचे पाणी, आरोग्य, वीज, शिक्षण, अध्यात्म, सामाजिक स्वास्थ, रोजगार, कला, साहित्य, क्रीडा, पर्यटन, जुनी पिढी, वाचन संस्कृती आदींचा समावेश असेल़सर्वांना सोबत घेऊन नवनिर्मितीनवनिर्मितीच्या स्वभावानुसार राजकारणातले एखादे पद घेऊन काम करण्यापेक्षा संपूर्णत: अराजकीय परंतु, सर्व राजकीय पक्षांना सोबत घेऊन अवघड वाटणारं पण अशक्य नसणारे ‘व्हिजन’चे काम हाती घेणार आहे. आपण ज्या पिढीच्या खांद्यावर बसून वाढलो़ त्या पिढीला साक्षी ठेवून आणि येणारी पुढची पिढी आपल्याला काहीच केले नाही असे म्हणू नये ही भावना ठेवून सर्वांनी मिळून हे काम करायचे असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे़
Lok Sabha Election 2019: नगरमधून गडाख यांची माघार : कुटुंबाच्या युध्दात रस नसल्याची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 10:49 AM