शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

Lok Sabha Election 2019 : गांधी दिल्लीत, विखे मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2019 4:02 PM

भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत़ शुक्रवारी त्यांनी कोअर कमिटीची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली,

अहमदनगर : भाजपाचे विद्यमान खासदार दिलीप गांधी गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत़ शुक्रवारी त्यांनी कोअर कमिटीची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली, तर डॉ़ सुजय विखे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांची मुंबईत भेट घेतली़ त्यामुळे खासदार दिलीप गांधी व विखे यांच्यात तिकिटासाठी संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत़अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून खासदार दिलीप गांधी उमेदवारीचे दावेदार आहेत़ परंतु, काँग्रेसचे डॉ़ विखे यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला़ विखे यांच्या भाजपप्रवेशाचे गांधी यांनी स्वागत केले असले तरी ते उमेदवारी करण्यावर ठाम आहेत़ भाजपची पहिली यादी शनिवारी जाहीर होणार आहे़ही यादी जाहीर होण्यापूर्वीच गांधी दिल्लीला रवाना झाले़ ते दिल्लीला रवाना झाल्यानंतर सायंकाळी जैन समाजाने नगरमध्ये बैठक घेऊन गांधी यांना उमेदवारी द्यावी, अन्यथा वेगळा विचार करू, असा पवित्रा घेतला़ गांधी यांच्या उमेदवारीसाठी भाजपवर दबाव वाढत असून, गांधी यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत़ त्यांनी भाजपाच्या दिल्लीतील कोअर कमिटीचे सदस्य नितीन गडकरी व सुषमा स्वराज यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे़ गांधी यांनी दिल्लीत उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केल्याने डॉ़ विखे यांनीही मुंबईत पालकमंत्री राम शिंदे, पंकजा मुंडे, महादेव जानकर या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.भाजपच्या पहिल्याच यादीत नाव यावे यासाठी विखे यांचा प्रयत्न आहे़ परंतु, गांधी यांनी सुरू केलेल्या प्रयत्नांमुळे विखे यांचे नाव पहिल्या यादीत झळकणार की नाही, याबाबत साशंकता आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर