अहमदनगर : शरद पवार विरूध्द विखे, असे चित्र तयार करू नका, असे सांगून कुठे शरद पवार आणि कुठे विखे, अशी टीका राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांनी शुक्रवारी येथे केली़ सुजय विखे यांचा भाजप प्रवेश पूर्वनियोजितच होता, असा आरोप यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आला.अहमदनगर लोकसभा मतदार संघातील राष्टÑवादीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचार नियोजनासाठी शुक्रवारी झालेल्या बैठकीत पिचड बोलत होते़ यावेळी पक्षाचे निरीक्षक दिलीप वळसे, अंकुश काकडे, आमदार अरूण जगताप, राहुल जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, पांडुरंग अभंग, राष्टÑवादी युवकचे कपिल पवार आदी उपस्थित होते़पिचड म्हणाले, मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास ही शेवटची निवडणूक असेल़ पुन्हा निवडणुका होणार नाहीत़ देशात हुकूमशाही येईल़ देशात एक नंबरचा पक्ष आहे, असे सांगतात़ पण त्यांना उमेदवार मिळत नाहीत़ अन्य पक्ष फोडून उमेदवार नेत आहेत़ या मतदारसंघात त्यांनी काँग्रेस पक्ष फोडून उमेदवार आणला़ काही जण ही लढाई पवार विरूध्द विखे, अशी आहे, असे सांगत आहेत़ परंतु, पवार यांचे राजकारण वेगळे आहे़ त्यांची आणि विखे यांची तुलना होऊ शकत नाही़ त्यामुळे ही लढाई युती विरूध्द आघाडी, अशीच होणार आहे. विनाकारण पवारांशी विखेंची तुलना करू नका, असे आवाहन पिचड यांनी पदाधिकाऱ्यांना केले़
Lok Sabha Election 2019 : कुठे पवार अन् कुठे विखे ? मधुकरराव पिचड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:44 PM