Rohit Patil ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचारसभा सुरू आहेत. काल महाविकास आघाडीची अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांच्यासाठी प्रचारसभा झाली. या सभेत दिवंगत नेते आर आर पाटील (आबा) यांचे पुत्र रोहित पाटील यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. रोहित पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. पाटील यांच्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
"निलेश लंके जर साधा माणूस असता तर नगर दक्षिणमध्ये देशाच्या पंतप्रधानांना सभा घेण्याची का गरज भासली याच उत्तर भाजपाच्या उमेदवाराने देण्याची आवश्यक्ता आहे, असा टोलाही रोहित पाटील यांनी सुजय विखे पाटील यांना लगावला.'देवेंद्र फडणवीस साहेब भाषणाला उभे राहिले की सांगतात की, इथल्या स्थानिक उमेदवाराकडे बघू नका. पंतप्रधान मोदींना करायचं आहे तुम्ही त्यांच्याकडे बघून मत द्या. आता याचा एकच अर्थ होतो की त्यांचा स्थानिक उमेदवारावर त्यांचा विश्वास नसावा. पाथर्डीला बैलांचा मोठा बाजार भरतो. इथले अनेक लोक बाजारात जात असतील, बैल खरेदी करत असतील, बैल विकत असतील. मालकाकडे बघून बैल खरेदी केला असं एकरी उदाहरण महाराष्ट्रात आहे का? उद्या आमचे प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीतून मोदी साहेब इकडे येणार आहेत का?, असा सवाल रोहित पाटील यांनी केला.
रोहित पाटील म्हणाले, मतदानाचे आणखी टप्पे वाढवले असते तर बोधे गावात सुद्धा सभा घ्यायला यांनी मागे पुढे बघितले नसते. एवढी दयनीय परिस्थिती यांच्या पक्षाची झाली आहे.
काँग्रेस सरकारचं नगर जिल्ह्यात मोठं काम
"महाराष्ट्र वेगळपण महाराष्ट्राने नेहमी जपलं. राज्यावर काँग्रेस तसेच सर्वच घटक पक्षाने उपकार केले आहेत. १९७२ च्या दुष्काळात मोठं काम केले आहे. नगर जिल्ह्याने अनेक मोठी माणस घडवली. सगळ्या नेत्यांचे उपकार या परिसरावर आहेत. या उपकाराची जर परतफेड व्हायची असेलतर या निवडणुकीपेक्षा दुसरी कोणतीही संधी नाही. ही देशाची निवडणूक आहे. देशाचा पंतप्रधान निवडण्याची ही निवडणूक आहे. महाराष्ट्रातील लोकांना माझा एक सवाल आहे, छत्रपती शिवाजी महाराजांपासून आम्ही एक स्वप्न बघत आहे, महाराष्ट्रातून कुणीतरी उठावं आणि दिल्ली काबीज करावी. दिल्लीवरती राज्य करावे, पवार साहेबांच्या माध्यमातून ही संधी आली होती. पण, तानाजी मालुसरेंसारखी कोणी साथ देण्याऐवजी सूर्याजी पिसाळ होऊन पाय खेचण्याचे काम आमच्याच मातीत केले. आता पवार साहेबांचा दिल्लीत मान वाढवायचा असेल तर आपण सर्वांनी महाराष्ट्रातून पवार साहेबांच्या मागे खासदार वाढवले पाहिजेत, असंही रोहित पाटील म्हणाले.