अहमदनगर: दहावी, बारावीनंतर काय करावे, स्पर्धेच्या युगात कोणत्या क्षेत्रात करिअर करावे? असे एक ना अनेक प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर असतात़ ‘लोकमत’च्या शैक्षणिक प्रदर्शनाच्या माध्यमातून मात्र या सर्व प्रश्नांची उत्तरे एकाच छताखाली मिळणार असून, हे एज्युकेशन फेअर विद्यार्थी आणि पालकांसाठी दिशादर्शक ठरेल असा विश्वास शिक्षण तज्ज्ञ आणि माजी कुलगुरू डॉ़ सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केला़‘लोकमत एज्युकेशन फेअर २०१९’ चे शुक्रवारी (दि़३१) शहरातील प्रेमदान चौकातील गायकावाड सांस्कृतिक भवन येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले़ यावेळी निमसे बोलत होते़ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संग्राम जगताप, महापौर बाबासाहेब वाकळे, विखे फौंडेशनचे उपसंचालक प्रा़ सुनील कल्हापुरे, विखे फौंडेशनच्या फार्मसी कॉलेजचे प्राचार्य प्रा़ बी़ वाय़ पवार, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य उदय नाईक, युनिक अॅकॅडमीचे संचालक गोपाल सैंदाने, स्टेट बँक आॅफ इंडियाचे मार्केटिंग मॅनेजर महेश साटम, अमेटी विद्यापीठाचे डॉ़ पंकज पांडे, डॉ़ स्वप्निल ताथेड, लोकमतचे उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश, आवृत्तीप्रमुख सुधीर लंके यांच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते़डॉ़ निमसे म्हणाले जगात सर्वात जास्त उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था भारतात आहेत़ उच्च शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ एकेकाळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक पर्याय खूप कमी होते़ आता पर्याच वाढले आहेत़ बदलत्या काळात शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे़ नगर जिल्हा आणि परिसरातील शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण दिले तर नगर हे शैक्षणिक हब होईल असा विश्वास निमसे यांनी व्यक्त केला़ प्रास्ताविकात सुधीर लंके महणाले दहावी-बारावीच्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक दिशा मिळावी, या उद्देशाने लोकमतच्यावतीने दरवर्षी शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते़योग्य मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल: संग्राम जगतापशैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत़ अशा परिस्थतीत विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करणे गरजेचे आहे़ लोकमतच्या शैक्षणिक प्रदर्शनातून हा आत्मविश्वास विद्यार्थ्यांना मिळणार आहे़ अनेक संस्थांचे स्टॉल एकाच ठिकाणी असल्याने यातून विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचणार आहे़ नगर जिल्ह्यात दर्जेदार शिक्षण संस्था आहेत़ याचा लाभ विद्यार्थी आणि पालकांना घेता येणार आहे़ असे शैक्षणिक प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी आहेत असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले़शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करणार: महापौर बाबासाहेब वाकळेदर्जेदार शिक्षणातून भावी पिढीचे उज्वल भविष्य घडत असते़ स्थानिक ठिकाणी विद्यार्थ्यांना अपेक्षित शैक्षणिक सुविधा मिळाल्या तर विद्यार्थ्यांसह त्या शहराचाही विकास होतो़ नगर शहरात दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेच्या माध्यमातून येणाºया काळात प्रयत्न करणार आहे़ विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठीही पाठपुरावा करणार आहे़ लोकमतचे शैक्षणिक प्रदर्शन कोतुकास्पद उपक्रम आहे असे मत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी व्यक्त केले़
‘लोकमत एज्युकेशन फेअर २०१९’चे शानदार उद्घाटन, शैक्षणिक माहिती एका छताखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 6:02 PM