शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

लोकमत महामॅरेथॉन : अल्ट्रा रनर आदित्यचे अहमदनगरमध्ये जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 3:40 PM

लोकमत महामॅरेथॉनच्या जनजागृतीसाठी मुंबईचा अल्ट्रा रनर आदित्य सोनवणे बुधवारी (दि़ २१) नगरमधून धावत आहे.

लोकमत महामॅरेथॉन : अल्ट्रा रनर आदित्यचे अहमदनगरमध्ये जल्लोषात स्वागत अहमदनगर : लोकमत महामॅरेथॉनच्या जनजागृतीसाठी मुंबईचा अल्ट्रा रनर आदित्य सोनवणे बुधवारी (दि़ २१) नगरमधून धावत  आहे. आज सकाळी  जिल्ह्याच्या हद्दीत आदित्यने प्रवेश करताच  विविध ठिकाणी  त्याचे स्वागत करण्यात आले. पुणे बसस्थानकाजवळ प्रसिध्द उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी स्वागत केले. लोकमत अहमदनगरचे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, ‘लोकमत’चे उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांनीही स्वागत केले.  यावेळी अंबादास हुलगे, गौतम जायभाय, दिनेश भालेराव, विजय कर्णे, अमृत पितळे, योगेश खरपुडे, दिनेश संकलेचा, डॉ. महेश मुळे, डॉ. शाम तारडे, प्रसाद तनपुरे, संदिप जोशी, महेंद्र हिंगे  उपस्थित होते. नगरमधील विविध ग्रुप त्याच्यासोबत धावले. नगर जिल्ह्यात हद्दीत प्रवेश केल्यानंतर पारनेर तालुक्यातील सुप्यात, केडगावमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. रनिंग संस्कृतीचा प्रसार व्हावा आणि लोकमत महामॅरेथॉनची नागरिक, धावपटुंमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, या उद्देशाने आदित्य सोनवणे पुणे ते औरंगाबाद असे २४० किलोमीटर धावणार आहे. आदित्य याने मंगळवारी (दि़२०) पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून रनसाठी प्रारंभ केला आहे. आदित्य हा बुधवारी सकाळी ८ वाजता जिल्ह्यातील सुपा येथे पोहोचला.  तेथे स्वागत झाल्यानंतर माळीवाडा बसस्थानकाजवळील नमो उद्योग समूहाजवळ त्याचे नगर रायझिंग रनर्स ग्रुपतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील खेळाडू व क्रीडापे्रमी उपस्थित राहणार आहेत. यावेळी आदित्य हा उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहे़  एकलव्य क्रीडा मंडळाचे खेळाडू त्याच्याबरोबर धावले. सुप्याच्या बसस्थानक चौकात रनरचे स्वागत करण्यात आले. यावेळी सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, उपनिरीक्षक संजयकुमार सोनी, तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राहुल शिंदे, भाजपाचे तालुका सरचिटणीस सुनील थोरात, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस सागर मैड आदींनी आदित्य सोनवणेचे हार व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी आपधुपचे उपसरपंच नामदेव गवळी, माजी सरपंच जयसिंग गवळी, किसन गवळी, शहजापूरचे सरपंच अण्णा मोटे उपस्थित होते. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर