सन्मतीवाणी/
ज्यावेळी आतून चेतना जागृत होईल. त्याचवेळी धर्मआराधना करण्याची संधी प्राप्त होते. केवळ बाह्य जागृती उपयोगी नाही. महावीरांनी जगाला आकार दिला. स्वप्नांची संख्या ७२ आहे त्यापैकी ३० स्वप्ने शुभस्वप्ने आहेत व उरलेली ४२ स्वप्ने सर्वसाधारण आहेत. प्रत्येक स्वप्नांमागील अर्थ समजून घेतला पाहिजे. स्वप्ने पडल्यावर त्याची भीती दूर करण्यासाठी जप केला पाहिजे.चक्रवर्ती ६ खंडाचे तर वासुदेव ३ खंडांचे अधिपती आहेत. जेव्हा तुम्ही मन, वाचा, कायेपासून दूर असता तेव्हाच ख-या अर्थाने भक्ती करण्यासाठी लायक ठरता. अर्थ, धर्म व परिवार म्हणजेच कुटुंबाच्या सुखाकरीता धर्म जागरण करावे लागते. त्यामुळे आपापले हेतू साध्य होण्यास मदत होते. कर्म बंधनातून मोकळे होण्यासाठी धर्मजागरण आवश्यक आहे. सात्वीक आहार घेऊन धर्मश्रध्दा ठेवून धर्माचरण केलं तर भक्तीला अर्थ येतो. महावीरांकडून चेतना जागृत होते. महावीरांनी जगाला आकार देण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यामुळे अहिंसेचा, शांततेचा प्रसार झाला. महावीरांचे जगावर अनंत उपकार आहेत. महावीरांसारखे महापुरुष संपूर्ण विश्वात वंदनीय आहेत. त्यांच्या संदेशाचा प्रसार झाला तर जगात शांतता नांदण्यास मदत होईल. जगातील महापुरुषांनी सत्य, अहिंसा तत्वाचा गौरव केला आहे. अहिंसेमुळे एकमेकातील प्रेमभावनेने माणसातील माणुसकी टिकविण्यात मदत होईल. -पू.श्री.सन्मती महाराज.