शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

माळीणच्या उदरात आजोळ हरवलं

By admin | Published: August 10, 2014 11:18 PM

शिर्डी : निसर्गाची मुक्त उधळण करीत असलेलं देखणं गाव माळीण, निसर्गाने आपल्या कवेत घेऊन क्षणात होत्याच नव्हतं करून टाकलं़

शिर्डी : निसर्गाची मुक्त उधळण करीत असलेलं देखणं गाव माळीण, निसर्गाने आपल्या कवेत घेऊन क्षणात होत्याच नव्हतं करून टाकलं़ या दुर्घटनेत १५२ नागरिक काळाच्या उदरात गडप झाले़ याबरोबरच अनेक नातीही थिजून गेली़ राजू शिंगाडे या तरुणाचे आजोळही या घटनेत हरवून गेल़ंराजू शिंगाडे हा तरुण शिर्डी नगरपंचायतमध्ये संगणक अभियंता आहे़ अगदी लहानपणापासून आजोळाशी जोडलेल्या आठवणींचं भेडोंळे उलगडतांना राजूचे अश्रूही सुकून गेलेत़ त्याने या दुर्घटनेत आजी, मामाचा मुलगा व चुलत मामाच्या कुटुंबासह नऊ जणांना गमावलं आहे़ त्याचं गाव वचपे. माळीण या आजोळच्या गावापासून अवघ्या तीन-चार किलोमीटर अंतरावर डिंबे धरणाच्या कडेवर बसलेलं़ माळीणमध्ये त्याची वृद्ध आजी व चुलत मामांचे कुटुंब राहत होते़ त्या कुटुंबातील अन्यजन पुण्यात स्थायिक झाले आहेत. सणासुदीला किंवा शेतीच्या कामाला घरी येणं होई़ घटनेच्या दोनच दिवस अगोदर मामाचा पदवीधर असलेला मुलगा जितेंद्र लेंभे हा पुण्यावरून भात आवणीच्या कामाला आला होता़ तो नेहमी मारुती मंदिरात झोपायला असे़ दिवसभरच्या कामानंतर घटनेच्या दिवशी मात्र तो घरीच झोपला होता़ चुलत मामा दुंडाजी लेंभे शेतावर गेल्याने वाचले़आजी बबाबाई व चुलत मामाच्या सहा मुली, मुलगा काळाने हिरावून नेले़राजूची आजी डोंगराच्या वरच्या बाजूला असलेल्या पहिल्या आळीत एका कौलारू घरात राहत होती़ प्रथम हीच आळी दरडीखाली गडप झाली़ पावसाळ्यात या गावाचं देखणेपणं खुलून येई, येथे झालेली मामांच्या मुलींची लग्ने,सणासुदीला जाणं-येणं, दिवाळी, उन्हाळी सुट्टयातील वास्तव्य, आंबे, करवंदे गोळा करणे, ओेढ्यावर आंघोळीला जाणे, या आठवणीं संपता संपत नाहीत़ विशेष म्हणजे जितेंद्र राजूचा समवयस्क असल्याने राजू गावी असेल तेव्हा आजोळीच राही़ तेथील आठवणी, आनंदाने व्यतित केलेले क्षण आता केवळ इतिहासजमा झालेत, उरल्या केवळ हृदयाला पीळ पाडणाऱ्या आठवणी़(प्रतिनिधी)