प्रकाश महालेलोकमत न्यूज नेटवर्कराजूर (अहमदनगर) : ऊस तोडणी करून माघारी परतत असताना आठ वर्षांपूर्वी चुकलेली आई त्या मुलांना भेटली आणि मायलेकांच्या चेह-यावर हसू फुटलं. या मायलेकांची ती हृदयस्पर्शी भेट पाहून अकोले तालुक्यातील विठे गावचे ग्रामस्थही भारावून गेले.सिल्लोड तालुक्यातील शिंदेफळ येथील उनवणे कुटुंब ऊस तोडणी करण्यासाठी श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव येथे आठ वर्षांपूर्वी आले होते. कारखाना संपत आला असताना मुलाला घरकूल मंजूर झाल्यामुळे तो गावाकडे आला. आई सुमन उनवणे (वय ७०) या मागे थांबल्या. पाच सहा दिवसांनी त्याही घराकडे येण्यासाठी फिरल्या. मात्र श्रीगोंदा बसस्थानकावर आल्या. अशिक्षित असल्याने आणि बोलताना अडखळत असल्याने त्यांना काही सुचेना. सिल्लोडकडे जाणा-या बसमध्ये बसण्याऐवजी दुसºयाच गाडीत त्या बसल्या व तेथून पुढे त्यांच्या प्रवासाची दिशा चुकत गेली. या गावाहून त्या गावाला फिरत असताना त्यांना मानसिक आजाराने ग्रासले.फिरत फिरत दिवाळीच्या काळात त्या अकोले तालुक्यातील ठाकरवाडी येथे पोहचल्या. शेजारीच असणारे विठे येथील पोलीस पाटील दत्तू वाकचौरे यांच्या वस्तीवर त्या गेल्या. पाटलीणबाईंनी त्यांना भाकरी दिली. विचारपूस केली असता त्या असंबद्ध बोलू लागल्या. आजींना एक पातळ दिले आणि त्यांना विठे गावात पाठवले. ग्रामपंचायत आवारात त्यांचा मुक्काम सुरु झाला. गावात भाकरी मागायची, ती खायची आणि काही वेळ ग्रामपंचायत शेजारील गवत काढण्याचे काम त्या करू लागल्या. या काळात कोणत्याही गावक-यांनी त्यांना त्रास होऊ दिला नाही. ग्रामस्थ, महिलांनी भाजी-भाकरी देण्याचा कधी कंटाळा केला नाही.मुलगा बुधवारी सकाळी विठ्यात ते पोहोचले आणि आपल्या आईला पाहून त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. मुलगा आणि नातू पाहून सुमनबाई भारावून गेल्या. आनंदाश्रूंनी डोळे भरून गेले. आठ वर्षांपूर्वी ताटातूट झालेली मायलेकरं एकमेकांना भेटली आणि उपस्थित महिलांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. हृदयद्रावक प्रसंग पाहून ग्रामस्थांनीएक हजार रुपये जमा झाले.ही रक्कम ग्रामस्थांनी त्यांच्या मुलांकडे प्रवासासाठी सुपूर्द केली आणि आनंदाश्रू ओघळणा-या डोळ्यांनी विठे ग्रामस्थांनी पाटील, सरपंच यांच्या उपस्थितीत या मायलेकांना अलविदा केले.मुलाने मानले ग्रामस्थांचे आभारआई घरी आली नाही हे पाहून आमच्या कुटुंबातील माणसांनी शोधाशोध सुरू केली. प्रत्येक नातेवाईकांच्या घरी गेलो. श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव, काष्टी, लोणी व इतर अनेक ठिकाणी फिरलो. आई सापडली नाही. दीड वर्ष तपास करीत होतो. पुन्हा पुन्हा आईची आठवण येत होती. आमच्या नातेवाईकांचा फोन आला. आई अकोल्यातील विठ्यात आहे हे कळले. मात्र आम्हीही चुकलो. अकोला जिल्ह्णात पोहचलो. तेथे कारखाना नाही हे समजले. पुन्हा फोन केला आणि अकोले तालुक्यात आलो. येथे आमची आई आम्हाला मिळाली. झालेला आनंद सांगता येण्यासारखा नाही. आठ वर्षांनंतर आमचे गावकरी येथे तोडणीला आल्यामुळे माहिती मिळाली. त्यांच्याकडून तपास लागला.विठे गावच्या लोकांनी आईला सांभाळून घेतले त्यांचे आभार मानू तेवढे थोडे असल्याची प्रतिक्रिया सुमनबाई यांचा मुलगा यादवराव गुंडाजी उनवणे यांनी व्यक्त केली.
हरवलेली आई आठ वर्षांनी भेटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:32 AM
ऊस तोडणी करून माघारी परतत असताना आठ वर्षांपूर्वी चुकलेली आई त्या मुलांना भेटली आणि मायलेकांच्या चेहºयावर हसू फुटलं. या मायलेकांची ती हृदयस्पर्शी भेट पाहून अकोले तालुक्यातील विठे गावचे ग्रामस्थही भारावून गेले.
ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यातील कुटुंबमायलेकांची ह्रदयस्पर्र्शी भेटग्रामस्थही भारावले