शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
2
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
3
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
4
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
5
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
6
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
7
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
8
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
9
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
10
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स
11
'ये है मोहोब्बते' फेम अभिनेत्याचा झाला साखरपुडा, होणाऱ्या बायकोसाठी लिहिली सुंदर पोस्ट
12
“लिहून ठेवा, एक दिवस उद्धव ठाकरे कुटुंबाला घेऊन देश सोडून निघून जातील”: रामदास कदम
13
रोहित शर्माची ऑस्ट्रेलियन संसदेत 'बोलंदाजी'; शेअर केल्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यातील खास गोष्टी
14
बच्चू कडू यांचे राणा दाम्पत्यास आव्हान; म्हणाले, "पुन्हा निवडणूक घ्या..."
15
मराठी सिनेमे डब का होत नाहीत? नाना पाटेकरांनी व्यक्त केली खंत; 'फुलवंती' चं नाव घेत म्हणाले...
16
शुक्र-अरुण ग्रहाचा नवपंचम योग: ६ राशींना वरदान, हाती लागेल घबाड; व्हाल मालामाल, शुभ-लाभ काळ!
17
EVM उत्पादक कंपनीने गुंतवणूकदारांना केलं श्रीमंत! अवघ्या २२० रुपयांचे मिळाले ३ लाख, सरकारचा आहे हिस्सा
18
पुण्याला हादरवणाऱ्या भयंकर घटनेवर आधारीत सिनेमा अखेर २२ वर्षांनी होतोय रिलीज, जाणून घ्या
19
सॅल्यूट! १६ व्या वर्षी लग्न, २ मुलांसह सासर सोडलं; कौटुंबिक हिंसाचाराशी लढून 'ती' झाली IAS
20
हेमंत सोरेन चौथ्यांदा बनले झारखंडचे मुख्यमंत्री, इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत घेतली शपथ 

तत्त्वनिष्ठ, दिलदार मित्र गमावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 4:59 AM

श्रीगोंदा : सर्वसामान्यांसाठी अडचणीच्या काळात धावून जाणारे, कार्यकर्त्यांची खडान‌् खडा माहिती असणारे, स्पष्टवक्ते अशी ओळख असणारे जिल्हा परिषद सदस्य ...

श्रीगोंदा : सर्वसामान्यांसाठी अडचणीच्या काळात धावून जाणारे, कार्यकर्त्यांची खडान‌् खडा माहिती असणारे, स्पष्टवक्ते अशी ओळख असणारे जिल्हा परिषद सदस्य सदाशिव (सदाअण्णा) पाचपुते यांच्या निधनाने श्रीगोंदा तालुक्यावर शोककळा पसरली आहे. तत्त्वनिष्ठ, दिलदार मित्र गमावला, अशा भावना तालुक्यातील राजकीय नेत्यांनी व्यक्त केल्या.

सदाशिव पाचपुते हे कलियुगातील खरे लक्ष्मण होते. आपल्या बंधूला आमदार, मंत्री करण्यासाठी त्यांनी कायम खिंड लढविली. विरोधी पक्षातील नेत्यांशीही मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले, अशा शब्दांत माजी आ. राहुल जगताप यांनी आदरांजली वाहिली.

पाचपुते घराणे आमचे राजकीय विरोधक होते. मात्र, सदाशिव पाचपुते यांनी कधीच तत्त्वाचे राजकारण सोडले नाही. अलीकडच्या काळात त्यांनी आपली जहाल भूमिका मवाळ केली होती, अशी प्रतिक्रिया नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी व्यक्त केली.

सदाअण्णा विरोधक असले तरी एक सच्चे मित्र होते. त्यांच्या निधनाने धक्का बसला आहे. असा मित्र होणे नाही, अशी भावना माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब भोस यांनी व्यक्त केली.

सदाअण्णा हे आधार देणारे परममित्र होते. त्यांनी मला अनेक संकटांत मदत केली. सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम केले. यातून आयुष्यभर उतराई होऊ शकणार नाही, अशी आठवण बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी जागविली.

सदाअण्णा हे राजकारणातील पाठीराखा होते. त्यांनी स्वत:साठी नव्हे तर संघटनेसाठी आयुष्य घालविले, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नेते भगवानराव पाचपुते यांनी व्यक्त केली. जिल्हा बँकेला मी सेवा सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढविणार होतो. मात्र, सदाअण्णा आजारी पडले. त्यामुळे आपल्याला मदत कोण करणार ही भावना मनात आली व मी निर्णय बदलला. माझा आधारच तुटला, अशी भावना जिल्हा बँक संचालक दत्तात्रय पानसरे यांनी व्यक्त केली.

----

१९ सदाशिव पाचपुते