शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

इन्स्टाग्रामवर प्रेम जडले, प्रेमासाठी मुलींनी परराज्य गाठले; पोलिसांनी शोधून आणले!

By साहेबराव नरसाळे | Updated: December 17, 2023 16:48 IST

नगर शहरातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या दोन मुली इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी झालेल्या ओळखीतून त्या मुलांच्या प्रेमात पडल्या.

अहमदनगर : इंस्टाग्रामवरून अनोळखी मुलांशी ओळख झाली. इंस्टाग्रामवरच चॅटींगच्या माध्यमातून प्रेम जुळले. मग प्रेमासाठी त्यांनी घरातून पलायन करत थेट परराज्य गाठले. आई-वडिल, नातेवाईकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात मुली हरवल्याची फिर्याद दिली. शेवटी पोलिसांनी परराज्यातून या मुलींना शोधून आई-वडिलांच्या हवाली केले. मुलींचा शोध लागला. पण आई-वडिलांनीही आपल्या मुला-मुलींवर लक्ष ठेवायला हवे, असे आवाहन कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी केले. 

नगर शहरातील अठरा वर्षे पूर्ण झालेल्या दोन मुली इंस्टाग्रामवर अनोळखी तरुणांशी झालेल्या ओळखीतून त्या मुलांच्या प्रेमात पडल्या. या मुलांसाठी त्या दोघीही घरातून निघून गेल्या. पालकांनी शोधाशोध केली. मात्र सापडल्या नाहीत. त्यानंतर पालकांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्यादी दिल्या. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलिसांनी एका मुलीला बिहार आणि उत्तर प्रदेशच्या सीमारेषेवरून आणले व पालकांच्या हवाली केले. त्यानंतर दुसऱ्या मुलीच्या शोधासाठी पथक पाठविण्यात आले. ही मुलगी मराठवाड्यात असल्याची माहिती पोलिसांनी तांत्रिक तपसातून काढली. त्यानंतर पोलिसांनी तिलाही शोधून आणत पालकांच्या स्वाधीन केले. मुलींचा तपास लावल्यानंतर नागरिकांनी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस जवान विश्वास गाजरे, रवी टकले, प्रमोद लहारे, सचिन लोळगे यांचा सत्कार केला. पोलिसांना पाहताच मुलींना पश्चातापसोशल मिडीयावर दिखाव्याच्या खोट्या गोष्टींमध्ये गुंतवून मुलींना अलगद जाळ्यात फसवले जाते. अशा दिखाव्याला मुली बळी पडतात. घरातील आई, वडील, नातेवाईकांचा जराही विचार न करता त्या खोट्या प्रेमाच्या दिखाव्याला भुलतात. मात्र यातून कुटुंबाला मोठा त्रास सहन करावा लागतो. बदनामी अटळ होते. जेंव्हा पोलिसांनी या मुलींना ताब्यात घेतले तेंव्हा त्यांना आपण खूप मोठी चूक केली असल्याची कबुली देत आपल्याला पश्चाताप होत असल्याचे मुलींनी सांगितले. पालकांनी मुला-मुलींचे मित्र व्हावेपालकांनी आपल्या पाल्यांवर कायम लक्ष देणे गरजेचे आहे. प्रत्येक विषयाबाबत वेळोवेळी संवाद साधावेत. पालकांचे आपल्या पाल्याशी मैत्रीपूर्ण संबंध असावेत. मुलांमध्ये फक्त भीती नको तर, आदरयुक्त भीती असावी, आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट