शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

माची डोंगराला १६ कि़मी़ लांब भेगा

By admin | Published: August 09, 2016 11:59 PM

अकोले : माची डोंगराला १६ किलोमीटर लांब मोठमोठ्या भेगा पडल्याने आंबित या आदिवासी खेड्यातील लोक जीव मुठीत घेऊन राहात आहेत़ गावकऱ्यांनी येथे न राहाता

अकोले : माची डोंगराला १६ किलोमीटर लांब मोठमोठ्या भेगा पडल्याने आंबित या आदिवासी खेड्यातील लोक जीव मुठीत घेऊन राहात आहेत़ गावकऱ्यांनी येथे न राहाता, प्रशासनाने सोय केलेल्या ठिकाणी सुरक्षित रहावे, तसेच परिसरातील भूस्खलनाची भू विज्ञान विभागाकडून तपासणी करुन गरज पडल्यास संपूर्ण गावाचे सुरक्षित पुनर्वसन करु, असा दिलासा देत आंबित गावात झालेल्या भूस्खलनाची पाहणी पालकमंत्री राम शिंदे यांनी केली.मंगळवारी सायंकाळी पावसाच्या जोरदार सरी अंगावर घेत मंत्री शिंदे यांचा ताफा दुर्गम आंबित या आदिवासी गावात पोहचला. गावातील ८३ कुटुंबातील १११ पुरुष व ९२ स्त्रियांचे शिरपुंजे येथील शासकीय आश्रमशाळेच्या इमारतीत तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. गावकरी दिवसा गावात, शेतात जातात आणि रात्री आश्रमशाळेत येतात. पालकमंत्री शिंदे यांनी गावात व माची डोंगरावर जावून परिस्थितीचा आढावा घेतला.वृध्द गावकऱ्यांशी संवाद साधला. सरकार संपूर्ण मदत करेल, असे आश्वासित केले. रस्त्याला पडलेल्या चार पाच फूट रुंदीच्या भेगांची पाहणी केली. डोंगराच्या भेगा दिवसागणिक मोठ्या होत चालल्याची चिंता गावकऱ्यांनी बोलून दाखविली.१३४ घरांची पडझड झाली असून त्याचे सार्वजनिक बांधकामकडून मूल्यांकन आल्यावर तातडीने मदत देवू, असे स्पष्ट केले. पाळीव जनावरे मृत्यूमुखी पडलेत त्यापैकी २२७ जनावरांचे शवविच्छेदन अहवाल मिळाले, २२७ अहवाल बाकी आहेत, सरकारने २१ लाख रुपये मदत दिली असून आणखी मदत दिली जाईल, असे शिंदे यांनी सांगितले. गावातील वृध्द किसन आमृता कोंडार, वृध्दा मैनाबाई साबळे यांची आस्थेने विचारपूस केली. तसेच शिरपुंजे आश्रमशाळेत स्थलांतरीत झालेल्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी आदिवासी नेते अशोक भांगरे, जालिंदर वाकचौरे, माजी खा़ भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. किरण लहामटे, दिलीप भांगरे, सिताराम भांगरे, मच्छिंद्र धुमाळ, प्रदिप हासे, वसंत मनकर, सोनाली धुमाळ, रमेश राक्षे, भाऊसाहेब आभाळे, जिल्हाधिकारी भानुदास पालवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे, प्रांताधिकारी संदिप निचित, तालुका कृषी अधिकारी माधव हासे, आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी अ‍े.पी.आहिरे, प्रभारी तहसिलदार जगदिश गाडे, गटविकास अधिकारी विजय आहिरे, वनपरिक्षेत्रपाल बी.जी.निमसे यांच्यासह आंबीत गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)