अहमदनगर : शहर व परिसरातील रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी अत्याधुनिक मशीन खरेदी केली जाणार असून, ही मशीन लवकरच महापालिकेत दाखल होईल, अशी माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी येथे दिली.
पुणे येथील कंपनीकडून येथील पारिजात चौकातील रस्त्याची मशीनद्वारे स्वच्छता केली. या प्रत्यक्षिकाची पाहणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार संग्राम जगताप, विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, स्थायी समिती सभापती अविनाश घुले, सभागृहनेते रवींद्र बारस्कर, नगरसेवक स्वप्निल शिंदे, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, भाजपचे प्रसिद्धिप्रमुख अमित गटणे आदी उपस्थित होते.
महापालिकेने स्वच्छ भारत अभियानात सहभाग घेतला आहे. महापौर वाकळे यांनी रस्त्यांची स्वच्छता करण्यासाठी अत्याधुनिक मशीन खरेदी करणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. मशीन खरेदीसाठी महापालिकेने निविदा मागविली असून, सुमारे एक कोटी रुपये खर्च करून मशीन खरेदी केले जाणार आहे. एका तासात सुमारे ८ कि.मी.चे रस्ते मशीनद्वारे स्वच्छ करणे शक्य होणार असल्याची माहिती या वेळी महापौर वाकळे यांनी दिली. स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले म्हणाले, दिवसेंदिवस महापालिकेतील स्वच्छता कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे कर्मचारी कमी पडत आहेत. नगर शहराचा विस्तार होत आहे. पुणे, मुंबई, इंदोर, अहमदाबाद, सुरत, नाशिक आदी शहरांत सध्या मशीनद्वारे स्वच्छता केली जात असून, ही मशीन महापालिका खरेदी करणार आहे, असे घुले म्हणाले.
...
सूचना फोटो मेलवर आहे.