संगमनेर : शहरातील काही बॅँकांमधून पैसे काढून ते पैसै संबंधित बॅँकांच्या एटीएममध्ये भरणाऱ्यासाठी दुचाकीहून निघालेल्या सिसको कंपनीच्या दोन कर्मचाºयांना चारचाकी वाहनातून आलेल्या चौघांनी रस्त्यात अडवले. या दोघांना बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याकडील ३६ लाख रुपये लुटण्यात आल्याची तक्रारही तालुका पोलीस ठाण्यात दाखल होती. हा सर्व बनाव असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी फिर्याद देणाºयासह तिघांनी हा बनाव केला असून पोलीसांनी शुक्रवारी पहाटे ३२ लाख ९४ हजार रुपए तिसºया व्यक्तीकडून हस्तगत करण्यात आले आहेत.सिसको कंपनीकडे संगमनेर व अकोले तालुक्यातील बॅँकांच्या एटीएममध्ये पैसे भरण्याचे काम आहे. संबंधित बॅँकांमधून पैसे काढून ते त्यांच्या एटीएममध्ये भरण्याचे काम करणारे सिसको कंपनीचे कर्मचारी मंगेश रमेश लाड (वय २९, रा. चास, नळवाडी, ता. सिन्नर, जि. नाशिक) व दत्ता सोनू पांडे (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) या दोघांनी आणि एकासह मिळून ३६ लाख रुपए लुटल्याचे पोलीस तपासात निष्पण झाले आहे. यातील ३२ लाख ९४ हजार रुपए तिसºया व्यक्तीकडून हस्तगत केले. लाड व पांडे हे दोघे संगमनेरातील काही बॅँकांमधून पैसे काढून ते त्यांच्या एटीएममध्ये भरण्यासाठी दुचाकीहून (एम. एच. १७ बी. बी. ५६०७) निघाले होते. शहर व परिसरातील काही बॅँकांच्या एटीएममध्ये पैसे भरून गुरूवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास हे दोघे दुचाकीहून राजापूर मार्गे जवळेकडलगहून वडगाव लाडंगा येथील एका बॅँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी जात असताना वडगाव लाडंगा शिवारात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनाच्या चालकाने हे दोघे प्रवास करीत असलेल्या दुचाकीला चारचाकी वाहन आडवे लावले. त्यातून चौघे जण खाली उतरत त्यातील एकाने लाड व पांडे यांना बंदुकीचा धाक दाखवला. त्यांच्याकडील पैश्यांची बॅग हिसकावून घेतली. या बॅगेत ३६ लाख रुपए होते. तसेच त्यांच्याकडील मोबाईलही काढून घेत चोरटे आलेल्या वाहनातून पसार झाल्याचा बनाव त्यांनी रचला होता.
लुटीचा बनाव : फिर्यादीच बनला आरोपी; तिघांनी रचला कट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 11:15 AM