देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत, असा आरोप नगर शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला. ओबीसी आरक्षण रद्द होण्याला मोदी सरकार जबाबदार असल्याचे सांगत शहर काँग्रेसच्या वतीने किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीगेट येथे काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, काँग्रेस नेते फारुक शेख, क्रीडा शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, तसेच अज्जूभाई शेख, हनिफ शेख, वीरेंद्र ठोंबरे, सुजित जगताप, अन्वर सय्यद, प्रशांत वाघ, जरीना पठाण, नलिनी गायकवाड, कौसर खान, उषाताई भगत, कल्पना खंडागळे, डॉ. मनोज लोंढे, ऋतिक लद्दे, योगेश दिवाने, आसाराम पालवे, सागर ईरमल, ॲड. सुरेश सोरटे, शंकर आव्हाड, प्रशांत ठोंबरे, शरीफ सय्यद, मोसीम शेख, इम्रान बागवान, अजय मिसाळ, विशाल घोलप, अक्षय पाचरणे आदी उपस्थित होते.
...................
फडणवीसांकडून जनतेची दिशाभूल
देवेंद्र फडणवीस ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहेत. फडणवीस यांनी स्वतः मुख्यमंत्री असताना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गहलोत यांना पत्र लिहून ओबीसींचा इम्पिरीकल डेटा देण्याची मागणी केली. पण केंद्राने ओबीसींचा डेटा दिला नाही. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले. आता केवळ राजकारणासाठी फडणवीस खोटे बोलून आंदोलन रेटत आहेत. ओबीसींचे राजकीय आरक्षण घालवून ओबीसी समाजाला सत्तेपासून वंचित ठेवण्याचा भाजपाचा डाव आहे, असा आरोप काळे यांनी केला.
...............
भाजप नेत्यांनी नरेंद्र मोदी यांनाच जाब विचारावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून महाविकास आघाडी विरोधात दिशाभूल करणारे ढोंगी आंदोलन करण्याऐवजी भाजप नेत्यांनी त्यांच्याच नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनाच जाब विचारावा असा टोला किरण काळे यांनी नाव न घेता भाजपाच्या या स्थानिक नेत्यांना लगावला.
.................
२६ किरण काळे