शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

राधाकृष्ण विखेंच्या प्रवेशाने नगर जिल्ह्यातील युतीचे जागावाटप बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 2:19 PM

राधाकृष्ण विखेंनी भाजपात प्रवेश केला आहे. ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी ही निवडून येत असल्याने शिर्डी मतदार संघ हा भाजपास सोडण्यात येऊ शकतो.

ठळक मुद्देशिर्डी मतदार संघ हा भाजपास सोडण्यात येऊ शकतो. इतरही ठिकाणी विधानसभेसाठी नव्याने जागा वाटप होतील, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही नगर जिल्ह्यात २५ व २६ ऑगस्टला येत आहे.

अहमदनगर -  राधाकृष्ण विखेंनी भाजपात प्रवेश केला आहे. ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी ही निवडून येत असल्याने शिर्डी मतदार संघ हा भाजपास सोडण्यात येऊ शकतो. तसेच इतरही ठिकाणी विधानसभेसाठी नव्याने जागा वाटप होतील, असे पालकमंत्री राम शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. यावेळी खा. सुजय विखे, माजी खा. दिलीप गांधी, महापौर बाबासाहेब वाकळे, आ. शिवाजी कर्डीले, बाळासाहेब मुरकुटे, बबनराव पाचपुते आदीसह भाजपाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ही नगर जिल्ह्यात २५ व २६ ऑगस्टला येत आहे. २५ तारखेला सकाळी शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असून लोणी येथे जाऊन राधाकृष्ण विखे यांची सांत्वन भेट घेणार आहेत. यानंतर अकोल्यात दुपारी २ वाजता महाजनादेश सभा होणार. ३  वाजता संगमनेर येथे मालपाणी लॉनमध्ये सभा होईल. राहुरी येथे सभा होऊन नगरला मार्गस्थ होणार आहे. सावेडी एमआयडीसी येथे भाजपाचे पदाधिकारी मुख्यमंत्री यांचे स्वागत करणार आहेत. शहरातून रॅली काढण्यात आल्यावर सायंकाळी सात वाजता गांधी मैदानात त्यांची सभा होणार आहे.

२५ तारखेला मुख्यमंत्री हे नगर विश्रामगृहावर मुक्कामाला थांबणार आहेत. २६ ला ते महाजनादेश यात्रा पाथर्डी कडे जाणार असून तेथे मार्केट यार्ड येथे ११.३० वाजता सभा होणार आहे. मात्र त्याआधी भिंगार, करंजी, तिसगाव येथे त्यांचे स्वागत होणार आहे. माणिकदौंडी मार्गे आष्टीला सभेनंतर जामखेड सभा होणार आहे, यानंतर बीड येथे सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले आहे. महाजनादेश यात्रा शिवसेनेच्याच मतदारसंघातून जात आहे, याकडे लक्ष वेधले असता राम शिंदे  यांनी ही यात्रा महायुतीची आहे. त्यामुळे शिवसेना देखील यात सहभागी आहेच असं म्हटलं आहे. 

तर भाजपा बारा जागा लढवेल...

नगर जिल्ह्यात महायुतीच्याच बारा जागा येतील. तसेच युती झाली नाही तर बाराही जागा लढवून भाजपा जिंकेल असे खासदार सुजय विखे यांनी सांगितले आहे.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRam Shindeराम शिंदे