संगमनेर (जिल्हा अहिल्यानगर) : माझे बदनामी करून माझ्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाड्या जाळल्या; वाहने तोडली, फलक जाळले याप्रकरणी माझ्यासह कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. गाड्या, वाहने दुरुस्त करता येतील, नव्या घेता येतील परंतु महिलांची काढलेली अब्रू परत मिळत नाही. अशी घणाघाती टीका डॉ.जयश्री थोरात यांनी केली आहे.
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे शुक्रवारी रात्री वसंत देशमुख याने जयश्री थोरात यांची बदनामी होईल असे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर जाळपोळ, वाहनांची तोडफोड झाली. देशमुख याच्या वक्तव्याने समस्त महिला वर्गाची बदनामी झा. मात्र सरकारचा उलटा न्याय आहे. सरकार कोणाच्या दबावाखाली काम करते? महिलांना अपशब्द बोलून, महिलांची बदनामी करून त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याचा सरकारचा हा न्याय कुठला आहे? असा खडा सवाल थोरात यांनी केला.
संगमनेर पोलीस ठाण्यात डॉ. जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. सुधीर तांबे आदीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर माध्यमांशी बोलताना डॉ. जयश्री थोरात यांनीही प्रतिक्रिया दिली.