पारनेर - लाडकी बहीण योजनेवर महाविकास आघाडी टीका करते. त्यांचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणात महालक्ष्मी योजना आणणार असल्याचे खोटे सांगून सत्तेत आले. अशीच आपल्या राज्यातील महाविकास आघाडीही खोटे बोलून सत्तेत यायचा प्रयत्न करत आहे, अशी टीका कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केली. पारनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार काशिनाथ दाते यांच्या प्रचारार्थ सोमवारी निधीन येथील मळगंगा देवी प्रांगणात प्रचार समारोप सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, उमेदवार काशिनाथ दाते, माजी नगराध्यक्ष विजय औटी, विश्वनाथ कोरडे, मधुकर उचाले, राहुल शिंद सुनील थोरात, सचिन वराळ, प्रभाकर कवाद, वसंत चेडे, राजाराम एरंडे, विक्रम कळमकर, सुपमा रावडे, राजेंद्र उबाळे, सरपंच चित्रा करा भामार उचाले, उपसरपंच पंकाल कारखिले, उपसरपंच माउली वरखडे, बाबासाहेब खिलारी, गणेश शेळके, डॉ. भाऊसाहेब खिलारी, शिवाजी खिलारी, सोनाली सालके, शिवाजी चौधरी, वसंत मोरे, इंद्रभान गाडेकर, माऊली वराहे, सुभाष लोंढे, सरपंच लहू भालेकर, दत्ता आवारी, मनोज मुंगर्स, मिश्वराय मैथे, उत्तम गायकवाड, विलास हारदे, उमेश सोनवणे, बाळासाहेब लामखडे, रोहिदास लामखडे, आप्पासाहेब बोरुडे आदी उपस्थित होते.
पारनेरकरांशी माझे जुने नाते आहे. पारनेर कारखाना हा स्वर्गीय गोपीनाथ मुंडे व माझ्या वडिलांची आठवण करून देणारा आहे. पारनेरकरांशी दुसरे नाते पारनेरकर महाराजांमुळे आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात कांदा, दूध, कापूस, सोयाबीन यामुळे शेतकरी नाराज होता. आम्ही केंद्र सरकारकडून निर्यात बंदी उठवली. भाव चांगला असून, विरोधक हे निवडणुकीपुरते आहेत, कांद्याचे भाव भविष्यात उतरणार नाहीत, अशी ग्वाही मुंडे यांनी दिली.
ग्रामपंचायत सदस्य सुधामती कवाद, विठ्ठल कवाद यांनी मुंडे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अपक्ष उमेदवार प्रवीण सुभाष दळवी, पतसंस्था ठेवीदार संघटना निघोज, ग्रामीण अल्पसंख्याक मंडळ, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, मुस्लिम संघटना, सावता माळी, जय मल्हार क्रांती संघटना प्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आदी यावेळी उपस्थित होते.
जनता आमच्या सोबत : दाते
काशिनाथ दाते म्हणाले, निघोज व परिसरातील जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागे उभे राहिली आहे. अपक्ष उमेदवार विजय औटी आमच्याबरोबर आहेत. भविष्यात कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. येथील लोकप्रतिनिधींनी राजकीय संस्कृती खराब केली आहे. माजी आमदार बाबासाहेब तुबे, वसंतराव झावरे, नंदकुमार झावरे, विजय औटी यांनी सुसंस्कृत राजकारण केले आहे. परंतु, आज अनेक लोक राजकीय दबावाखाली आहेत. तरीही ते आम्हाला मदत करणार आहेत.