शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

"ताईचे पराक्रम..."; जयश्री थोरातांबाबत आक्षेपार्ह विधान, सुजय विखे म्हणतात, "ते ऐकत नसल्याने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 10:05 AM

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या कन्येबाबात माजी खासदार सुजय विखेंच्या सभेत खालच्या पातळीवर टीका करण्यात आलीय.

Sujay Vikhe : संगमनेरमध्ये भाजपच्या एका जेष्ठ नेत्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि त्यांच्या कुटुंबियांबाबत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. संगमनेरच्या धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी आयोजित केलेल्या युवा संकल्प मेळाव्यात विखे समर्थक असलेल्या वसंतराव देशमुख यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं.वसंतराव देशमुख यांनी केलेल्या वक्तव्याचे संगमनेरमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत.  जयश्री थोरातांबाबत वसंतराव देशमुखांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर सुजय विखेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

सुजय विखे यांच्या भाषणापूर्वी देशमुख यांनी हे वक्तव्य केले. या सभेनंतर धांदरफळ येथे काँग्रेस कार्यकर्त्यांना देशमुख यांच्या वक्तव्याचा निषेध केला. याशिवाय अकोले नाका परिसरात लावण्यात आलेले विखे यांचे बॅनरही फाडण्यात आले. तसेच विखे समर्थकांच्या काही वाहनांचीही तोडफोड झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांना सुजय विखे, वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात तणाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे सुजय विखे यांनी या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.

"महायुतीच्या मेळाव्यामध्ये वसंतराव देशमुख यांनी स्थानिक नेत्यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. ते टीका करत असताना मी त्यांना दोनदा थांबवण्याचा प्रयत्न केला होता. दुर्दैवाने ते थांबत नसल्याने मी माझं भाषण लिहायला सुरुवात केली. ते स्टेजवर काय बोलले हे माझ्या लक्षात आलं नाही. माझं भाषण संपल्यानंतर गोंधळ सुरू झाला आणि मी तेव्हा एकाला विचारलं की काय नेमकं झालं. मी तिथे वसंतराव देशमुख यांच्या वक्तव्याचे निषेध नोंदवायच्या आधीच सगळा गोंधळ उडाला. महायुतीच्या कुठल्याही नेत्याचा त्या वक्तव्याशी संबंध नाही. मी त्या वक्तव्याचा निषेध करतो. कुठलाही राजकीय नेता कुठल्याही राजकीय पक्षाचा असो असे वक्तव्य करत असेल तर त्याला पक्षामध्ये ठेवले जाणार नाही महायतीमध्ये ठेवले जाणार नाही," असं सुजय विखे पाटील म्हणाले.

"वसंतराव देशमुख यापूर्वी अनेक वादांमुळे वादांमध्ये अडकलेले आहेत. दुर्दैवाने मी स्टेजच्या खाली उतरल्यावर त्यांचे भाषण सुरू झालं. भाषण सुरू झाल्यानंतर मी दोन कार्यकर्त्यांना त्यांना खाली बसवण्यासाठी सांगितलं कारण ते आक्षेपार्ह वक्तव्य करतील. ते ऐकत नसल्याने मी म्हटलं की पाच मिनिटं त्यांना बोलू द्या. त्यानंतर मी माझ्या भाषणाची तयारी करायला लागलो. त्यानंतर माझं भाषण झालं आणि मग गोंधळाला सुरुवात झाली तेवढ्या वेळात काय घडलं मला समजलं नाही. या वक्तव्याचा महायुतीशी काही संबंध नाही आम्ही त्याचा निषेध करतो," असेही सुजय विखे म्हणाले.

"या सगळ्या गोंधळात आमच्या सभेला आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्या जाण्या झाल्या गाड्यांमध्ये असलेल्या महिलांना खाली उतरवण्यात आलं आणि त्या फोडण्यात आल्या. माझा एवढचं म्हणणं आहे की वसंतराव देशमुख यांच्यावर पोलिसांनी योग्य ते कलम लावून कारवाई करावी त्यामध्ये आम्ही कधीही मध्ये येणार नाही. पण ज्या लोकांनी आमच्या गाड्या जायला सभेला आलेल्या महिलांचा खाली उतरवलं त्यांच्यावरही योग्य कारवाई व्हावी," असंही आवाहन सुजय विखे यांनी केलं.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकSujay Vikheसुजय विखेBJPभाजपा