- अरुण वाघमोडेअहमदनगर : ‘मी डिमांडर नव्हे तर कमांडर आहे’ असे म्हणणाºया महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षाला विधानसभा निवडणुकीत भाजपाने एकही जागा सोडली नाही़ अखेर दौंड आणि जिंतूर हे दोन मतदारसंघ तरी पक्षाला मिळतील अशी अपेक्षा असताना शेवटच्या क्षणी येथील दोन्ही उमेदवारांना भाजपानेच एबी फॉर्म देत विधानसभेत ‘रासप’चा कपबशी रिकामीच ठेवली.जानकर यांनी २००३ साली स्थापन केलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाने गेल्या पंधरा ते सोळा वर्षात महाराष्ट्रासह २७ राज्यात पक्षाची ओळख निर्माण केली. धनगर समाजासह बहुजनांच्या प्रश्नांवर आवाज उठविणाºया जानकरांची सर्वव्यापक ओळख निर्माण झाली़ जानकरांच्या पक्षाचा विस्तार पाहता २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने रासपला जवळ करत मंत्रिमंडळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले़ वर्षभरापूर्वी जानकरांचे पक्ष स्थापनेपासूनचे सहकारी असलेल्या बाळासाहेब दोडतले यांना शेळी-मेंढी पालन महामंडळाचे अध्यक्षपद दिले़ सत्तेत सहभागी झालेल्या जानकरांचा आवाज मात्र गेल्या पाच वर्षात क्षीण झालेला दिसला़विधानसभा निवडणुकीत जानकरांनी रासपला प्रथमच ५७ जागा देण्याची भाजपाकडे मागणी केली. त्यानंतर १४ अन् शेवटच्या क्षणी दोन जागांवर समाधान मानले होते़ भाजपाने मात्र या दोन जागाही जानकरांच्या पदरात टाकल्या नाहीत.पक्षाच्या वाट्याला एकही जागा न आल्याने उद्विग्न झालेल्या जानकरांनी दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल आणि पक्षाने जिंंतूर मतदारसंघातून घोषित केलेल्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांची रासपमधून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले़ ‘भाजपाने फसविले असले तरी महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे’ असे सांगत जानकरांनी महायुतीतच राहण्याचा निर्णय घेतला आहे.पक्षाची अवहेलना कार्यकर्त्यांच्या जिव्हारी- रासपच्या महाराष्ट्रात शहरासह ग्रामीण भागातही शाखा स्थापन झालेल्या असून, कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे़ विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षालाही महायुतीकडून एकही जागा न मिळाल्याने ही अवहेलना कार्यकर्त्यांच्या जिव्हारीलागली आहे़- सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावता यावीत, यासाठी पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी भाजपासोबत जाण्याचा निर्णय घेतला़ विधानसभा निवडणुकीत पक्षाला हक्काच्या जागा मिळणे अपेक्षित होते़ मात्र एकही जागा मिळाली नाही़ पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्यानुसार आमची पुढील वाटचाल राहणार असल्याचे रासपचे अहमदनगरचे उत्तर जिल्हाध्यक्ष शरद बाचकर यांनी सांगितले़
Maharashtra Election 2019 : जानकरांची कपबशी रिकामीच राहणार! ‘रासप’चा एकही उमेदवार नाही; पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 4:30 AM