शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'अनेक डरकाळ्या फोडल्या पण स्वत: उभे नाही राहू शकले'; सत्यजीत तांबेंचा विखे पाटलांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 6:32 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये संगमनेर विधानसभा मतदारसंघ शिंदे गटाला सोडण्यात आला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :  गेल्या काही दिवसापासून संगमनेर विधानसभा चर्चेत आहे. भाजापचे नेते सुजय विखे पाटील यांनी या मतदारसंघात संपर्क दौरा सुरू केला होता. विखे पाटील या मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण ही जागा महायुतीमध्ये शिंदे गटाला सुटली आहे. दरम्यान, संगमनेर विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमोल धोंडीबा खताळ यांना रिंगणात उतरवले आहे. 

"त्या उमेदवाराला पराभूत करू"; अजित पवारांच्या उमेदवाराविरोधात सोमय्यांनी थोपटले दंड

लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटील यांना दक्षिण नगर मतदारसंघात उमेदवारी दिली होती. पण त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने मोठा पराभव केला. यामुळे सुजय विखे पुन्हा एकदा विधानसभेसाठी तयारी करत होते. पण ही जागा आता शिंदे गट लढवणार आहे. दरम्यान, आता यावरुन आमदार सत्यजीत तांबे यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. 

"आपल्याला वाटत असेल उमेदवार डमी आला, उमेदवार डमी आला नाही. आपली लढाई त्या उमेदवाराच्या कोण आहे त्यांच्या बरोबर आहे.  आपली लढाई त्या उमेदवाराच्या मागे असणाऱ्या विखे पाटील यांच्याबरोबर आहे. अनेक डरकाळ्या फोडल्या पण स्वत: उभे राहू शकले नाहीत,असा निशाणा आमदार सत्यजीत तांबे यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्यावर साधला. 

दोन दिवसापूर्वी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांच्या संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले. यानंतर संगमनेरचे वातावरण चांगलच पेटले. राजकीय वर्तुळातून आरोप -प्रत्यारोप सुरू झाले. त्याच दिवशी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले. शुक्रवारी रात्री १० वाजता संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर सुरू झालेले आंदोलन सकाळी सव्वा सहा वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर येथेच शनिवारी सकाळी १० वाजता पुन्हा आंदोलनाला सुरुवात झाली आहे. सुजय विखे-पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती.

यावेळी विधानसभा निवडणुकीत विखे पाटील विरुद्ध थोरात असा सामना जोरदार रंगणार असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024Satyajit Tambeसत्यजित तांबेBJPभाजपाSujay Vikheसुजय विखे