नेवासा : तालुक्यातील बऱ्हाणपूर येथील ग्रामपंचायत सदस्यावर गावठी कट्ट्यातून चार गोळ्या झाडत प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या मुख्य आरोपीस शनिशिंगणापूर पोलिसांनी पिंपरी चिंचवड येथून रविवारी अटक केली.
बाळासाहेब भाऊसाहेब हापसे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
ग्रामपंचायत सदस्य संकेत भानुदास चव्हाण (वय २५) यांच्यावर १५ जून २०२१ रोजी कांगोणी फाट्यानजीक मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी गावठी कट्ट्यातून चार फायर केले होते. चव्हाण गंभीर जखमी झाल्याचे पाहून आरोपी लगेचच फरार झाले होते. या घटनेने परिसर भयभीत झाला होता. तेव्हापासून शनिशिंगणापूरचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल, स्थानिक पथक, गुन्हा अन्वेषणचे पथक आरोपीच्या शोधासाठी कार्यरत होते.
सचिन बागुल, हेड काॅन्स्टेबल ज्ञानेश्वर माळवे, पोलीस नाईक बापू फुलमाळी यांनी पिंपरी चिंचवड येथील खराबवाडी येथे राहत असलेल्या प्रेयसीच्या घरातून मुख्य आरोपी बाळासाहेब भाऊसाहेब हापसे यास अटक केली. दुसरा आरोपी विजय भारशंकर अजूनही फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे.
050721\img-20210704-wa0112.jpg
ब-हाणपुर ग्रामपंचायत सदस्यावर गोळीबार करणा-या मुख्य आरोपीसह शनिशिंगणापुर पोलिसांचे पथक