श्रीगोंदा : विसापूर तलावाचा मुख्य दरवाजा आवर्तन सोडताना नादुरुस्त झाला आहे. अधिकाऱ्यांनी दरवाजा पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजामधून १० ते १५ क्युसेसने पाण्याची गळती कायम होत आहे. विसापूरचे आवर्तन बंद करण्याचा कालावधी जवळ येऊ लागला आहे. आवर्तन बंद झाल्यानंतर दरवाजा पूर्ण बंद कसा करावा असा प्रश्न जलसंपदा विभागासमोर आहे. तीन वर्षापूर्वी अशाच प्रकारे विसापूर तलावाचा दरवाजा नादुरुस्त झाला होता. हा दरवाजा दुरुस्त करताना एकाचा बळी गेला होता. विसापूर तलावातील १४७ एमसीएफटी पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आले आहे. जलसंपदा विभागास विसापूरचा दरवाजा दुरुस्त करण्यासाठी सर्व तंत्रज्ञान वापरावे लागणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
विसापूर तलावाचा मुख्य दरवाजा नादुरुस्त
By admin | Published: December 20, 2015 11:17 PM