पारनेर (अहमदनगर) : स्मशानातील कोळसा वापरून लिंगबदलाचा दावा करणारा कान्हूरपठार येथील बबन सीताराम ठुबे (६६) उर्फ मेजरबाबा व त्याची पत्नी लता यांची शुक्रवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून या बाबाचा भांडाफोड केला होता. त्यानंतर बबन व त्याच्या पत्नीला अहमदनगरच्या जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली होती. दोघांनाही २० आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर आता त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली आहे. मात्र या गुन्ह्यातील अन्य आरोपी माधव सोनावळे, अण्णा सोनावळे, सुनीता खोडदे, विजय ठुबे हे अजूनही पारनेर पोलिसांना सापडलेले नाहीत.नमुने प्रयोगशाळेत पाठविणारमेजरबाबाच्या घरातून जादूटोण्यासाठी वापरली जाणारी पावडर, कवड्या व बाहुल्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत़ यातील पावडर आता सरकारी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविली जाणार आहे. या प्रकरणाचा आणखी तपास सुरू आहे, अशी माहितीपोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी दिली़
मेजरबाबाची पत्नीसह न्यायालयीन कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 5:18 AM