राहाता : सरकारमध्ये असूनही उसाच्या उचलीबाबत आंदोलनाचा फार्स निर्माण करणाऱ्या शेतकरी संघटनेने एफआरपीच्या प्रश्नांवरुन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे एवढेच गांभीर्य असेल तर, शेतमालाच्या आधारभूत किमतीसाठी वर्षा बंगल्यावर आणि नागपूरला मोर्चे काढा असा सल्ला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शेतकरी संघटनेला दिला. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात विखे बोलत होते. गणेशचे अध्यक्ष मुकुं दराव सदाफळ, उपाध्यक्ष प्रतापराव जगताप, पोपटराव लाटे, सभापती बेबीताई आगलावे, वाल्मीकराव गोर्डे, रावसाहेब देशमुख, वैजयंती धनवटे यांसह कार्यकारी संचालक अभिजीत भागडे, संचालक, सभासद,कामगार उपस्थित होते. विखे यांनी शेतकरी संघटनेच्या भूमिकेवर तसेच सरकारच्या सहकार आणि शेतकरी विरोधी धोरणांवर कडक शब्दात टीका केली. उसाच्या एफआरपीबाबत कायदा करण्यात आला आहे. ज्या कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे ऊस उत्पादकांना पैसे दिले नसतील तर त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याची तरतूद आहे, हे माहीत असतानाही शेतकरी संघटना शेतकऱ्यांची दिशाभूल का करते? सरकारमध्ये राहूनही आंदोलनाची भाषा करण्यापेक्षा सरकारमधून बाहेर पडा असा सल्ला त्यांनी दिला़प्रास्ताविक अॅड. रघुनाथ बोठे यांनी केले. संचालक भाऊसाहेब शेळके यांनी आभार मानले.
‘वर्षा’वर मोर्चा काढावा
By admin | Published: October 27, 2016 12:30 AM