अहमदनगर : शहरासह उपनगरात मोठ्या उत्साहात साजरा झालेला गणेशोत्सव यंदा व्यावसायिकांसाठी मोठी पर्वणी ठरला़ दहा दिवशीय उत्सवात नगरच्या बाजारपेठेत सुमारे ५० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज व्यक्त होत असतानाच नगरच्या बाजारपेठेवरील मरगळ गणपती बाप्पांनी दूर सारली आहे. पाऊसही मदतीला धावून आला आहे. त्यामुळे चिंतेत सापडलेला व्यापार उद्योगाच्या अपेक्षा उंचावल्या असून, दसरा-दिवाळीतील उलाढाल मोठी असेल असे म्हटले जात आहे. गणेशोत्सवात सुमारे तीन हजार तरुणांना रोजगार मिळाला़ शहरात २२५ मान्यताप्राप्त गणेश मंडळे आहेत़ यापेक्षाही अनधिकृत मंडळे जास्त आहेत़ या वर्षीची आकडेवारी पाहता शहरासह भिंगार, बोल्हेगाव, सावेडी, बुरुडगाव, केडगाव परिसरात तब्बल दीड लाख घरांमध्ये श्रीं ची प्रतिष्ठापना करण्यात आली होती़ त्यामुळे मूर्तीकार, विक्रेते, सजावटीचे साहित्य विके्रत्यांनाही बाजारपेठ मिळाली़ सुमारे अडीच लाखांहून अधिक नारळाची विक्री झाली़ पारंपरिक मोदकांबरोबर मावा, चॉकलेट यासह विविध मिठाईने दुकाने सजली होती़ गणेशोत्सवाच्या अर्थकारणाशी तब्बल ३५ ते ४० विविध घटक सहभागी असून, त्यांचा थेट अर्थकारणाशी संबंध आहे. त्यात मांडव उभारणाऱ्यांपासून मोदक बनविणाऱ्या महिलांपर्यतच्या घटकांचा समावेश आहे़ (प्रतिनिधी)उत्सवपूर्तीतील महत्त्वाचे घटक सराफी व्यावसायिक, मंडप , मूर्तीकार, सजावटकार, सेट भाड्याने देणारे, सनईवादक, तुतारीवादक, ढोलपथक, लोककलाकार, फोटोग्राफर, व्हिडीओशुटींग, फ्रेममेकर्स,निवेदक, रेकॉर्डिंग स्टुडिओ, डीजे, साऊंडवाले, पूजेचे साहित्य विक्रेते, प्रसाद, फराळ तसेच मोदक विक्रेते, अहवाल छपाई, फ्लेक्स, बोर्ड, बॅनर्स, बँड पथके, सांस्कृतिक कार्यक्रम संयोजक, वैयक्तिक परीक्षक, अभ्यासक, मार्गदर्शक, पौरोहित्य, रांगोळीकार, महिला बचतगट, भजन मंडळे, खाद्य पदार्थ विक्रेते, इलेक्ट्रीशियन, शोभेचे साहित्य, देखावे तयार करणारे, पोस्टर विक्रेते, सजावटीचे साहित्य विक्रेते, प्रसादाचे मोदक तयार करणारे बचतगटडेकोरेशनवर सर्वाधिक खर्च बाजारपेठेत नवनवे सजावटीचे साहित्य उपलब्ध असल्याने या साहित्याला सार्वजनिक गणेश मंडळासह घरगुती ग्राहकांकडूनही मोठी मागणी असते़ या गणेशोत्सवात गणेशमूर्ती व्यासपीठावर केलेले डेकेरेशन, लाईटमाळांवर सर्वाधिक खर्च करण्यात आला़ सार्वजनिक मंडळांनी दहा हजारापासून ते तीन ते चार लाखांपर्यंत डेकोरेशनवर खर्च केला़ - रंजन कारखिले, सजावटकार.ढोल-ताशे जोरात, रोषणाई चमकलीगणेशोत्सवात दरवर्षी डीजे सिस्टिमवर विविध गणेश मंडळांचा मिळून सुमारे २५ ते ३० लाख रुपये खर्च होतो़ यंदा हा खर्च निम्यावरून कमी झाला़ तर प्रथमच ढोल-ताशा, डोली-बाजा, बँन्जोपार्टी या पारंपरिक वाद्यावर खर्च झाला़ पारंपरिक वाद्यावर सुमारे १५ ते २० लाख रुपये खर्च झाला़
गणराय पावले, बाजाराने मरगळ झटकली
By admin | Published: September 12, 2014 11:07 PM