टाकळी ढोकेश्वर : लॉकडाऊनमुळे पारनेर पोलिसांनी गावठी दारूच्या हातभट्टी वाल्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. ३० एप्रिल रोजी सायंकाळी मांडवे खुर्द, वारणवाडीमध्ये दारू अड्ड्यावर छापा टाकून ५ हजार पाचशे रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली हा छापा टाकण्यात आला. याबाबतची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सूरज दिलीप कदम यांनी पोलिसात दिली आहे. संतोष संतोष उर्फ वाल्मिक पोपट बिडकर (रा.मांडवे खुर्द, ता. पारनेर) या दोघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मांडवे गावचे शिवारात शासकीय विश्रामगृह पाठीमागील लिंबाच्या झाडाखाली गावठी दारूची विक्री हे दोन्ही आरोपी करीत होते.दुसरीकडे २९ एप्रिल रोजी सायंकाळी वारणवाडीत कारवाई करण्यात आली आहे. येथे ७८० रूपयांची देशी, विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. यासबंधीची फिर्याद पोलीस कॉन्स्टेबल सुरज दिलीप कदम यांनी दिली आहे. याप्रकरणी सुनील अर्जुन कोकाटे (रा. वारणवाडी, ता. पारनेर)याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार जी. एन. फसले, रोहिदास शेलार, सुरज कदम करीत आहेत.
मांडवे खुर्द, वारणवाडीतील गावठी दारू अड्डा उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2020 1:44 PM