शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला', मल्लिकार्जुन खर्गेंच्या 'त्या' वक्तव्यावर PM मोदींचा घणाघात
2
अंधेरी पूर्वेत पंधरा ते वीस दुकानांना भीषण आग;कामगार अडकल्याची भीती, अग्निशमनच्या गाड्या दाखल
3
जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा टार्गेट किलींग; 2 बिगर कश्मिरी मजुरांवर दहशतवाद्यांचा गोळीबार
4
पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्या पायाला दुखापत, दुबईत विमानातून उतरताना अपघात झाला
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
6
कॅनडामध्ये सुपरलॅबचा भंडाफोड, मोठ्या प्रमाणात ड्रग्ज आणि शस्त्रे जप्त, भारतीय वंशाच्या व्यक्तीला अटक
7
३०० कंटेनरचे सामूदायिक लक्ष्मीपूजन; सांगवीच्या तरुणांकडे ४५० कंटेनरची मालकी
8
"बाळासाहेब असते तर थोबाड फोडलं असतं"; अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया
9
ऐन दिवाळीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी दोन्ही पवारांची धावाधाव
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगली विधानसभेत महाविकास आघाडीला धक्का! जयश्री पाटील निवडणूक लढवण्यावर ठाम
11
Maharashtra Election 2024: नाशिक पूर्वमध्ये थेट सामना; अन्य तीन मतदारसंघात तिरंगी, चौरंगी लढत
12
Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगनंतर तेजीसह बाजार बंद, 'या' १० शेअर्समध्ये जोरदार खरेदी, गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी
13
Mumbai Crime: फटाके फोडण्याच्या वादातून तरुणाची हत्या, मुंबईतील धक्कादायक घटना
14
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
15
किंग कोहलीची 'विराट' चूक; मैदानात थांबण्यापेक्षा चोरटी धाव घेण्याच्या नादात फसला (VIDEO)
16
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
17
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
18
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
19
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
20
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला

‘मनगाव’ प्रकल्प ही मनोरुग्णांची ‘माउली’ : शिवकुमार डिगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 11:12 AM

‘मनगाव’ प्रकल्पाने घर आणि मन हरविलेल्या महिलांना नुसता निवाराच दिलेला नाही, तर त्यांना जीवनात उभारी दिली आहे.

अहमदनगर : ‘मनगाव’ प्रकल्पाने घर आणि मन हरविलेल्या महिलांना नुसता निवाराच दिलेला नाही, तर त्यांना जीवनात उभारी दिली आहे. हा प्रकल्प समाजासाठी दीपस्तंभ आहे. धर्मादाय आयुक्त म्हणून आपण स्वत: अशा प्रकल्पांच्या पाठिशी आहोत, असे प्रतिपादन राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी शिंगवे येथे बोलताना केले. त्यांनी स्वत: या प्रकल्पासाठी दोन लाख रुपयांची देणगी दिली.माउली प्रतिष्ठान १९९८ पासून नगर- शिर्डी महामार्गावर शिंगवे येथे मनोरुग्ण महिलांसाठी काम करते. मनोरुग्ण महिलांचा सांभाळ करण्यासाठी जुन्या प्रकल्पात जागा अपुरी पडत असल्याने संस्थेने हा ६०० खाटांचा विस्तारीत प्रकल्प हाती घेतला आहे. त्यातील पहिल्या १२० खाटांच्या प्रकल्पाचे लोकार्पण झाले. डिगे यांच्यासमवेत हाँगकाँग येथील द वन इंटरनॅशनल ह्युमॅनॅटॅरियन अवॉर्ड समितीचे संस्थापक डॉ. डेविड हरिलीला, अमेरिकेतील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका निलू निरंजना गव्हाणकर, हर्षल मोरडे, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, रामदास फुटाणे, राजन खान, गीतकार प्रवीण दवणे, डॉ. रवींद्र कोल्हे, शरद बापट, प्रकल्पासाठी तीन एकरचे भूमीदान करणारे बलभीम व मेघमालाताई पठारे तसेच प्रकल्पाचे संस्थापक डॉ. राजेंद्र व सुचेता धामणे यांच्या हस्ते हे लोकार्पण झाले. याप्रसंगी समारंभासाठी व्यासपीठावर आमदार संग्राम जगताप, ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, बा.ग.धामणे गुरुजी, अशोक गुर्जर, विजयकुमार ठुबे, अविनाश सावजी, दीपक दरे, गोविंद पाटील यांची उपस्थिती होती.डिगे म्हणाले, मनोरुग्ण महिलांचा सांभाळ करणे हे मोठे काम आहे. ही संस्था म्हणजे अशा महिलांची माउली आहे. राज्यातील धर्मादाय रुग्णालये आपण अशा संस्थांच्या पाठिशी उभी करु. गव्हाणकर म्हणाल्या, मानसिक आरोग्य हा जगभराचा चिंतेचा विषय आहे. माउली संस्था यात जगाचे लक्ष वेधणारे काम करत आहे. डेविड यांनी माउलीचे काम हे मदर तेरेसा यांच्या मार्गावर जाणारे असल्याचे सांगितले. प्रारंभी संस्थेचे संस्थापक डॉ. राजेंद्र धामणे यांनी या प्रकल्पाच्या प्रवासाची माहिती दिली.या महिलांप्रती मी व डॉ. सुचेता कर्तव्य भावनेतून काम करत आलो आहे. समाज सोबत आला म्हणून हे काम करता आले, असे ते म्हणाले. या प्रकल्पाला तीन एकर जागेचे दान देण्याचे दातृत्व दाखविणारे बलभीम व मेघमाला पठारे यांचा यावेळी मान्यवरांनी गौरव केला. कुटुंबातील किंवा आपल्या संस्थेतील एक घटक समजून या संस्थेला दान करा, असे आवाहन त्यांनी केले. या समारंभाचे सूत्रसंचालन विना दिघे यांनी केले. तर, प्रकल्पातील समन्वयक मोनिका साळवी यांनी स्वागत केले.धार्मिक संस्थांनी दुष्काळासाठी निधी द्यावा: डिगेधर्मादाय संस्थांच्या विश्वस्तांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. विश्वस्तांनी चांगले काम केल्यास आपण स्वत:हून त्यांच्या दारी जाऊ, असे डिगे म्हणाले. धार्मिक काम करणाऱ्या संस्थांकडे मोठी देणगी येते. त्यांनी हा निधी दुष्काळात जनावरांच्या छावण्यांसाठी खर्च करावा, असे आवाहन त्यांनी केले.फुटाणे, खान यांच्याकडूनही आर्थिक मदत४फुटाणे म्हणाले, या प्रकल्पात येऊन भाषण व विनोद कसा करायचा? येथे काम करण्याची गरज आहे. ‘माउली’चे डॉ. राजेंद्र व सुचेता धामणे यांनी ‘मनगाव’ हे मंदिर साकारले आहे. शिर्डी-शिंगणापूरला येणाºया भाविकांनी या मंदिरातही थांबावे. दररोज एक रुपया या संस्थेला दान करा असे आवाहन करत त्यांनी स्वत:ची तीन वर्षाची मदत दिली. लेखक राजन खान यांनी या संस्थेत कार्यकर्ता म्हणून नव्हे तर कामगार म्हणून काम करायला आवडेल असे सांगत स्वत: समाजात जावून एक लाख रुपये देणगी जमवून देणार असल्याचे जाहीर केले. महिलांना समाजाने रस्त्यावर सोडले नाही, तर अशा प्रकल्पांची गरज भासणार नाही, अशाही भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केल्या. पोपटराव पवार यांनी हा जगाचे लक्ष वेधणारा प्रकल्प असल्याचे सांगितले.तुझ्याविन वैकुंठाचा कारभार चाललाप्रकल्पाचे लोकार्पण झाल्याने मनोरुग्ण म्हणून संस्थेत असणा-या सर्व महिलांना या नवीन वास्तूत स्थलांतरित करण्यात आले. भेटायला येणारे पाहुणे पाहून या महिला हरखून गेल्या होत्या. कधीकाळी बेवारस अवस्थेत असणाºया या महिलांना आता सर्व सुविधायुक्त घर मिळाल्याचे पाहून पाहुणेही भारावून गेले. अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. यातील काही महिलांनी ‘तुझ्याविन वैकुंठाचा कारभार चालला’ या गीतावर व्यासपीठावर नृत्य सादर करत पाहुण्यांचे आगळेवेगळे स्वागत केले. त्यांच्या कलेला सर्वांनी दाद दिली.‘लोकमत’च्या पुरस्कार योजनेचे मानांकनडॉ. राजेंद्र व सुचेता धामणे यांच्या कामाची दखल घेत ‘लोकमत’ने महाराष्टÑीयन आॅफ द इयर या पुरस्कार योजनेत गतवर्षी त्यांना मानांकित केले होते. त्यांच्या मानांकनावर राज्यभरातून मोहोर उमटली होती.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर