केडगाव : नगर तालुक्यातील मांजरसुंभा गावाने पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कपस्पर्धेमध्ये सहभागी होत असल्याने ग्रामस्थांनी सर्वोकृष्ट काम करण्याची गरज आहे. गावाने उत्कृष्ट काम करुन कप जिंकण्याचे आवाहन प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांनी केले.विशेष ग्रामसभेत त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच जालिंदर कदम, उपसरपंच रंजना कदम, स्पधेर्चे जिल्हा प्रमुख बाळासाहेब शिंदे, चेअरमन गोरक्षनाथ कदम ग्रामस्थ उपस्थित होते.प्रांताधिकारी गाडेकर म्हणाल्या, स्पर्धा परीक्षांसाठी गावातील युवकांना मार्गदर्शन करणार आहे. गावातील महिला, युवक यांनी पारितोषिक मिळवावयाचे ध्येय ठेवावे. प्रत्येक कामामध्ये एकमेकात समन्वय ठेवावा असेही आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. गावाने वॉटर कप जिंकावा. यासाठी प्रशासनासाच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. मी गावची मुलगी समजून श्रमदानासाठी कामासाठी येणार आहे. स्पर्धेच्या नियोजनासाठी होणा-या राजस्तरीय ट्रेनिंगसाठी रोहिणी बाबासाहेब कदम, रंजना कदम, तुकाराम कदम, सुदाम कदम, डॉ. राम कदम यांची निवड करण्यात आली. तुकाराम वाखुरे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार गोरक्षनाथ कदम यांनी मानले. राज्यात २०१६ आणि २०१७ या दोन वर्षी भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर पाणी फाऊंडेशनच्या वतीने अभिनेता आमिर खान व किरण राव यांनी तिसरी सत्यमेव जयते वॉटर कप २०१८ स्पर्धा जाहीर केली. स्पधेर्चे हे ३ रे वर्ष असून ७ हजार २०० पेक्षा गावांनी यात सहभाग घेतला आहे. या वर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा कालावधी ८ एप्रिल ते २२ मे २०१८ पर्यत आहे. विजेत्या पहिल्या तीन गावांना अनुक्रमे ७५ लाख रुपये, ५० लाख रुपये व ४० लाख रुपये रोख पारितोषिक दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक तालुक्यातून स्पर्धेत आघाडीवर असलेल्या गावालाही प्रत्येकी दहा लाख रुपये रोख पारितोषिक मिळणार आहे. स्पर्धेत विजेत्या गावांना एकूण १० कोटी रुपयांची पारितोषिके मिळणार आहेत.
गावाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. विविध उपक्रम गावाने यशस्वीपणे राबवले आहेत. वॉटर कपही मिळण्यासाठी आणखी चांगले काम करण्यात येणार आहे. १५ वर्षेापासून राजकीय हेवेदावे सोडून सुशिक्षित मंडळीसह काम करत आहोेत. गावात नियोजनबद्ध पद्धतीने काम चालू असून स्पधेर्मुळे होणा-या कामामुळे पाणीपातळी नक्कीच वाढणार आहे.-जालिंदर कदम, सरपंच