अण्णा नवथर
अहमदनगर : नगर- मनमाड महामार्गाची पुरती चाळण झाली आहे़ नगर ते कोपरगाव मार्गावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत़ सर्वाधिक अवजड वाहनांची वर्दळ असणाºया या महामार्गावर लहान-मोठी वाहने, दुचाकीस्वरांना अक्षरश: जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे़ जिल्ह्यातील मंत्र्यासह या भागातील आमदार महामार्गाच्या दुरुस्तीसाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे़
नगर जिल्ह्यातील सर्वाधिक वाहतूक असलेला नगर- मनमाड हा एकमेव महामार्ग आहे़ नगर ते कोपरगाव हे अंतर ९६ कि़मी़ इतके आहे़ सन २००६ ते २०१० या काळात महामार्गाचे मजबूतीकरण करण्यात आले़ हे काम करणाºया विकासाकडे हा महामार्ग होता़ विकासकाची मुदत संपली़ त्यामुळे टोल वसुलीतून सुटका झाली़ पण, रस्त्याची अल्पावधीत दुरवस्था झाली़ हा महामार्ग जागतिक बँक प्रकल्प विभागाच्या अधिपत्याखाली आला़
दरम्यानच्या काळात रस्त्याकडे दुर्लक्ष झाले़ परिणामी ठिकठिकाणी खड्डे पडले़ साईडपट्ट्यांचा भराव पावसाच्या पाण्याने वाहून गेला़ दुभाजकाच्या बाजूने खड्ड्यांची रांग लागली़ डांबराचा थर उखडून खड्डे पडले़ हे खड्डे बुजविण्यासाठी जुलै महिन्यांत १ कोटी ४० लाखांची निविदा काढण्यात आली़ एकूण १०० कि़मी़ साठी सहा म्हणजे १५ ते २० कि़मी़ साठी एक ठेकेदाराची नेमणूक झाली़ कार्यारंभ आदेश मिळाल्यापासून ते आॅगस्ट अखेरपर्यंत एक-एक करून खड्डे बुजविले असते तर पावसाळ्यात रस्त्याची ही अवस्था झाली नसती़ मात्र ठेकेदारांनी वेळीच खड्डे बुजविले नाहीत़ ठेकेदार मोठे खड्डे पडण्याची वाट पाहत बसले़ जागतिक बँकेच्या अधिकाºयांनी बघ्याची भूमिका घेतली़ धो-धो पाऊस पडायला सुरुवात झाल्यानंतर सगळेच जागे झाले़ पण, पावसात बुजविलेले खड्डे फारकाळ टिकत नाहीत़ पावसात बुजवलेले खड्डे वाहून जात असल्याने पुन्हा खड्डे पडत आहेत़ वाहने खड्ड्यात आदळल्याने वाहनांचे मोठे नुकसान होत असून या मार्गावर अपघातांची संख्याही वाढली आहे़ वाढत्या अपघातांना जबाबदार कोण? प्रशासन की ठेकेदार याची चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे़़़़१ लाख ६ हजार मेट्रिक टनाची वाहतूकनगर-मनमाड महामार्गाचा आराखडा तयार केला त्यावेळी साधारण ते ६ ते १२ टन क्षमतेची वाहने होती़ अलिकडे ३० ते ४० टनांची वाहने आली आहेत. ही वाहने या महामार्गावरून जातात़ पावसामुळे रस्ता खचतो़ रस्त्यातील पाणी काढून देण्यासाठी कसरत करावी लागते़ परिसरातील शेतकरी पाणी काढू देत नाहीत़ त्यामुळे मनमाड महामार्गाची दुरवस्था झाली असल्याचे कार्यकारी अभियंता नरेंद्र राजगुरू यांचे म्हणणे आहे़़़़दुरुस्तीच्या १३५ कोटींना कात्रीनगर-मनमाड महामार्गाच्या दुरुस्तीसाठी जागतिक बँक प्रकल्प विभागाने १३५ कोटींचंी तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पात करण्याचा प्रस्ताव दिला़ हा प्रस्ताव शासनाने मंजूरही केला़ परंतु, कोविड-१९ मुळे इतर खर्चाला सरकारने कात्री लावल्याने या निधीलाही बे्रक मिळाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़ ़़़मंत्री, खासदारांच्या बैठकाही निष्फळ ठरल्यानगर-मनमाड महामार्गासाठी खासदार डॉ़ सुजय विखे यांनी अनेक बैठका घेतल्या़ प्रशासनाला सूचनाही केल्या़ त्यामुळे खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले़ नगरविकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही बैठका घेतल्या़ पण, त्याचा फारसा उपयोग झाला नाही़ सध्या राज्याचे अधिवेशन सुरू आहे़ या अधिवेशानात तरी हा प्रश्न मार्गी लागेल का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे़