अहमदनगर: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील झालेल्या सभेत अकरा लाखांची सोन्याची चैन चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाथर्डी येथून अटक केली. अमोल बाबासाहेब गिते ( वय २६, रा. खांडगाव, ता. पाथर्डी) असे अटक केलेल्या आराेपीचे नाव आहे. मनोज जरांगे पाटील हे रविवारी अहमदनगर दौऱ्यावर होते. त्यांची राहाता येथे सभा होती. या सभेला राहाता येथील साकुरी किशोर चांगदेव दंडवते हे गेले होते. त्यांच्या गळ्यातील १० लाख ९५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन व पेंडल चोरी झाले. त्यांनी राहाता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तांत्रिक विश्लेषणात वरील आरोपीने चोरी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी पाथर्डी येथे सापळला रचला. त्यात वरील आरोपी अलगद अडकला. आरोपीकडून तुटलेली सुमारे १ लाख २५ हजार रुपये किमतीची तुटलेली सोन्याची चैन हस्तगत करण्यात पेालिसांना यश आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या राहाता येथील सभेतून सोन्याची चैन लांबविली
By अण्णा नवथर | Published: October 14, 2023 4:57 PM