अहमदनगर : जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल हाती येत असून, यापैकी बहुतांशी ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले आहे. यातील दहा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. काही ठिकाणी मात्तबरांनी गड राखण्यात यश मिळविले आहे.माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या काष्टी गावात पाचपुतेंनी सत्ता राखली असून, बेलवंडी येथे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार गटाच्या सदस्यपदाच्या सर्व जागा जिंकल्या़ पण सरपंचपदाने हुलकावणी दिली आहे. घोगरगाव येथे भाजपचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांच्या गटाला धक्का बसला असून, तेथे राष्ट्रवादीने गड जिंकला आहे.कोपरगाव तालुक्यात भाजपच्या कोल्हे गटाने सर्वाधिक १३ ग्रामपंचायतींवर झेंडा फडकावला असून, राष्ट्रवादीच्या काळे गटाला ८ ग्रामपंचायतींची सत्ता मिळाली आहे़ काँगे्रस व शिवसेनेच्या ताब्यात प्रत्येक १ ग्रामपंचायत गेली असून, दोन ग्रामपंचायतींवर अपक्षांनी बाजी मारली आहे़पारनेर तालुक्यात शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या गटाच्या ताब्यात ७ ग्रामपंचायती आल्या असून, राष्ट्रवादीकडे ४, काँगे्रस २ तर इतरांनी तीन ग्रामपंचायतींवर विजय मिळविला आहे़
नगर तालुक्यात धक्कादायक निकाल
नगर तालुक्यात २७ ग्रामपंचायतींची मतमोजणी पूर्ण झाली असून, २७ सरपंच विजयी तर २६० सदस्य विजयी झाले आहेत़ नगर तालुक्यात भाजप तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग आणि राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष केशव बेरड यांच्या पॅनलला धक्का बसला असून भाजप आमदार शिवाजी कर्डिले समर्थक बाजार समितीचे उपसभापती रेवणनाथ चोभे यांच्या पत्नी रेश्मा चोभे पराभूत झाल्या आहेत़ नगर तालुक्यातील नागरदेवळे, वाळकी, नारायणडोह, उक्कडगाव, आठवड, पांगरमल अशा ग्रामपंचायतींवर कर्डिले गटाचे वर्चस्व राहिले़
नगर तालुक्यातील सरपंच
1) वाळकी- स्वाती बोठे, 2) नागरदेवळे - सविता पानमळकर, 3) नेप्ती - सुधाकर कदम, ४) कौडगाव - धनंजय खर्से, ५) पिंपळगाव कौडा - सतिष ढवळे, ६) जखणगाव - सविता कर्डिले, ७) सोनेवाडी-चास - स्वाती सुंबे, ८) दहिगाव - मधुकर म्हस्के, ९) वडगाव तांदळी - सविता ठोंबरे, १०) साकत - जाईबाई केदारे, ११) आठवड - राजेंद्र मोरे, १२) सारोळा बद्धी - सचिन लांडगे, १३) मदडगाव - सुनिता शेडाळे, १४) सोनेवाडी (पिला) - मोनिका चांदणे, १५) आगडगाव - मच्छिंद्र कराळे, १६) नांदगाव - सुनिता सरड, १७) टाकळी खातगाव - सुनील नरवडे, १८) राळेगण -निलेश साळवे, १९) खातगाव टाकळी - संगीता कुलट, २०) शेंडी - सिताराम दाणी, २१) कापूरवाडी - संभाजी भगत, २२) सारोळा - भारती कडूस, २३) बाबुर्डी बेंद - अशोक रोकडे, २४) रांजणी - बाळासाहेब चेमटे, २५) नारायणडोह - सविता गायकवाड, २६) पांगरमल- बाप्पूसाहेब आव्हाड, २७) उक्कडगाव - नवनाथ म्हस्के़
श्रीगोंद्यातील सरपंच
बेलवंडी -सुप्रिया पवार, तरडगव्हाण - नवनाथ डोके, घोगरगाव -बाळासाहेब उगले, तांदळी दुमाला -संजय निगडे़
पाथर्डी तालुक्यातील सरपंच
1) कोळसांगवी - वसंत पेटारे, 2) मोहरी - कल्पजीत डोईफोडे, 3) जिरेवाडी - उमाजी पवार, 4) वैजूबाभूळगाव - उज्वला गुंजाळ, 5) कोल्हार - शोभा पालवे, 6) सोनोशी - विष्णू दौंड, 7) वडगांव - रंजना धनवे, 8) कोरडगाव - विष्णु देशमुख, 9) भालगाव - मनोरमा खेडकर, 10) तिसगांव - काशिनाथ पाटील लवांडे़
जामखेड तालुक्यात भाजपचे वर्चस्व
पालकमंत्री प्रा़ राम शिंदे यांच्या जामखेड तालुक्यातील राजुरी, रत्नापुर, शिऊर या तीनही ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या असून, राजुरी ग्रामपंचायतीत गणेश कोल्हे, रत्नापूर ग्रामपंचायतीत दादासाहेब वारे व शिऊर ग्रामपंचायतीत हणमंत उतेकर हे सरपंचपदी विराजमान झाले आहेत़