नेवासा : मराठा, धनगर, मुस्लिम समाजाच्या आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाच दिवसांपासून सुरु असलेल्या ठिय्या आंदोलनानंतर नेवासा येथे शुक्रवारपासून सुरू झालेल्या साखळी उपोषणाला पाठींबा देण्यासाठी नेवासा तालुक्यातील बहिरवाडी सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांनी राजीनामा दिले. बहिरवाडी सोसायटीचे अध्यक्ष रविंद्र काळे, उपाध्यक्ष कल्पना कोरेकर यांनी राजीनामा दिला आहे.साखळी उपोषणाच्या दुस-या दिवशी शनिवारी तालुक्याचे माजी आमदार शंकरराव गडाख यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांची चौकशी केली. अँड.सतीश पालवे, रामभाऊ जगताप, गफूर बागवान, सीताराम जाधव, ज्ञानेश्वर तोडमल, दिलीप फटांगरे, अभिजित मापारी, रफीक पठाण, किशोर सोनवणे, कैलास कुंभकर्ण हे उपस्थित होते. राजीनाम्याचे पत्र सचिव व साखळी पद्धतीने चाललेल्या उपोषणकर्त्यांना दिले आहे. शनिवारी माजी आमदार शंकरराव गडाख यांनी साखळी उपोषणाला भेट दिली. दरम्यान बहिरवाडी येथील पदाधिका-यांचे राजीनामा पत्र देतेवेळी बाळासाहेब कोरेकर,अशोक नांगरे, उपोषणकर्ते भाऊसाहेब वाघ, अनिल ताके, दीपक धनगे,पोपटराव जिरे, बाळासाहेब कोकणे, युसूफ बागवान, राहुल देहाडराय, नारायण लोखंडे, लक्ष्मण जगताप, अंबादास इरले, मयूर वाखुरे, गणेश कोरेकर, राजेन्द्र पटारे, उपस्थित होते.
मराठा आरक्षण : नेवासा तालुक्यातील बहिरवाडी सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचे राजीनामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 3:26 PM