यावेळी जनाधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्यासह शहराध्यक्ष शहानवाज शेख, नगर तालुकाध्यक्ष किरण जावळे, सुशील साळवे, दीपक गुगळे, अमित गांधी आदी उपस्थित होते. शासनाने या पूर्वी अंगणवाडी सेविकांना दिलेले सर्व ॲप हे मराठी भाषेत होते आणि आता अचानकपणे नवीन ॲप शासनाने आपल्याकडे कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका यांना पूर्णपणे इंग्रजी भाषेतून दिले आहे. ते त्यांना वापरण्यात येईल का याची आधी शहानिशा करणे गरजेचे होते. आज नवीन अंगणवाडी सेविकांच्या भरतीबद्दल शासकीय निकष जरी बदललेले असतील, तरीही आज कार्यरत असणाऱ्या एकूण अंगणवाडी सेविकांपैकी बहुतांशी सेविका कमी शिक्षित आहेत. त्यामुळे त्या सर्वांना या नवीन ॲपवर माहिती भरणे शक्य नाही. त्यामुळे शासनाने आपल्या या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि नव्याने दिलेल्या पोषण ट्रॅकर ॲपमध्ये इंग्रजी भाषेसह मराठी भाषेचाही समावेश करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. जोपर्यंत पोषण ट्रॅकर ॲपमध्ये मराठी भाषेचा समावेश होत नाही तोपर्यंत अंगणवाडी सेविकांना माहिती अद्ययावत करण्याचा आग्रह करू नये. तसेच आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार न केल्यास जनाधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
----------
फोटो मेल
०८जनाधार निवेदन
अंगणवाडी सेविकांना दिलेल्या ॲपमध्ये मराठी भाषेचा समावेश करावा, या मागणीसाठी जनाधार संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.