पारनेर : निर्भयाच्या मारेक-यांना फाशी दिल्याने जनतेचा न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढला आहे, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. दिल्लीतील निर्भयाच्या आरोपींना शुक्रवारी सकाळी फाशी दिल्यानंतर राळेगणसिद्धीत (ता.पारनेर) येथे सकाळी १० वाजता हजारे यांनी मौन सोडले. यावेळी आमदार निलेश लंके उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
हजारे म्हणाले, मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाल्याने खऱ्या अर्थाने निर्भयाला न्याय मिळाला. निर्भयाला न्याय मिळण्यास सात वर्षे लागली. पोलीस चौकशी, कायदा, न्यायव्यवस्थेत कुठे उणिवा राहिल्या का? याचा अभ्यास होण्याची गरज आहे. त्यातून महिलांवरील अत्याचाराच्याविरोधात कठोर कायदे करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घ्यायला हवा. ‘देर है लेकिन अंधेर नही’ हे सुद्धा यातून उघड झाले, असे हजारे यांनी सांगितले.
Nirbhaya Case : राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यकाळातील पहिलाच मृत्युदंड
Nirbhaya Case : नराधमांचे मृतदेह कुटुंबीयांनी ताब्यात न घेतल्यास काय? सरकारकडे एकच पर्याय
राज्याप्रमाणेच देशभर कायदा करावामहिला, युवतींवरील अत्याचार रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात नवा दिशा कायदा आणण्याचा निर्णय घेतला आहे. तसा कायदा केंद्र सरकारनेही करावा, असे मत हजारे यांनी व्यक्त केले. रखडलेला न्यायालय जबाबदारी कायदाही केंद्र शासनाने लवकरात लवकर मंजूर करावा, अशी मागणी हजारे यांनी केली.