शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

जिल्हाभरातील आठवडे बाजार बंद

By admin | Published: June 04, 2017 3:50 PM

पारनेर तालुक्यातील पारनेर, अळकुटी, वनकुटे येथील आठवडेबाजार शेतकऱ्यांनी स्वंयस्फुर्तीने बंद ठेवले़

अहमदनगर : शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हाभरातील रविवारचे आठवडे बाजार बंद ठेवण्यात आले़ पारनेर तालुक्यातील पारनेर, अळकुटी, वनकुटे येथील आठवडेबाजार शेतकऱ्यांनी स्वंयस्फुर्तीने बंद ठेवले़राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपामध्ये पारनेरमध्ये रविवारीही उत्स्फुर्तपणे शेतकरी सहभागी झाले होते़ रविवारी पारनेर शहरातील आठवडे बाजारात शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आणलाच नाही़ यामुळे बाजारात सकाळपासूनच शुकशुकाट होता़ पारनेर शहर व परिसरातील ग्राहक भाजीपाला आणण्यासाठी आले होते़ मात्र त्यांना रिकाम्या पिशव्या घेऊन परतावे लागले. शेतकऱ्यांनी उत्स्फुर्तपणे बाजार बंद केल्यानंतर बाहेरीला व्यापाऱ्यांनी शेतमाला व्यतिरिक्त इतर वस्तु विक्रीसाठी आणल्या होत्या़ मात्र, शेतकऱ्यांचाच माल विक्रीला नाही, त्यामुळे व्यापाऱ्यांनाही माल विकू दिला जाणार नाही, असा पावित्रा योगेश मते, बाळासाहेब मते, दिपक नाईक, महेंद्र मगर, धीरज महांडुळे, दादा शेटे, मंदार नाईक, रायभान औटी, मंगेश कानडे, बाबासाहेब चेडे, संदीप कावरे आदींनी घेतला़ त्यामुळे व्यापाऱ्यांनीही आणलेला माल परत नेला़संपामुळे कोरडगाव, खरवंडीतील बाजार बंदशेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी पाथर्डी तालुक्याच्या पूर्वभागातील कोरडगाव व खरवंडीकासार येथील आठवडे बाजार तसेच दुध संकलन केंद्र बंद ठेवण्यात आले. बाजारपेठांमध्ये फळे, भाजीपाल्यांची आवक बंद झाली आहे. कोरडगाव येथे डायनामिक्स, रिलायन्स, प्रभात तसेच तालुका दुधसंघाचे संकलन केंद्र असुन येथे दर दिवशी सुमारे चार हजार लिटर दुधाचे परिसरातून संकलन होते. याची दुध व्यवसायावर मोठी आर्थिक उलाढाल अवलंबुन आहे. सदर संकलन केंद्र बंद असल्याने आर्थिक उलाढाल ठप्प झाली. कोरडगाव येथील शेतकऱ्यांनी दुध रस्त्यावर ओतून शासनाचा निषेध केला. राष्ट्रीय महामार्गावर खरवंडी ही महत्वाची बाजारपेठ आहे. येथील बाजार बंद असल्याने सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. शेतकरी भाजीपाला जनावरांना चारा म्हणून देत आहे. दुधापासुन दुग्धजन्य पदार्थ बनविले जात आहेत.विसापूर येथील आठवडे बाजार बंद संपाबाबत विसापर परिसरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. संप मागे न घेता संपाला पाठींबा चालू ठेवण्यासाठी विसापूर येथील आठवडे बाजार बंद ठेवण्यात आला. प्रत्येक रविवारी विसापूर येथे आठवडे बाजार भरत असतो. रविवारी नेहमीप्रमाणे आठवडे बाजारात व्यापाऱ्यांनी माल विक्रीसाठी आणला होता़ मात्र, शेतकरी संप असल्याचे कळताच व्यापाऱ्यांनी तेथून काढता पाय घेतला़ सरकारने जयाजी सुर्यवंशी यांना हाताशी धरुन शेतकऱ्यांचा संप मोडीत काढण्याचा प्रयत्न केला़ शेतकऱ्यांना सरकारची भुमिका मान्य नसल्याने सोमवारी महाराष्ट्र बंदला पाठींबा देण्यासाठी कोळगाव व विसापूर परिसरातील गावांमध्ये व्यवहार बंद राहणार आहेत.