अहमदनगर : लॉकडाउनच्या आदेशाची 31 ऑगस्ट रोजी मुदत संपली असल्याने दिनांक 2 सप्टेंबर पासून नवे नियम लागू करण्याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदीे यांनी मंगळवारी जारी केला. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा, दुकाने आता सकाळी नऊ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास प्रशासनाने परवानगी दिली आहे. यापूर्वी दुकाने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती. त्याची मुदत दोन तासांनी वाढविण्यात आली असल्याने व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
याशिवाय सर्व नियमांचे नेहमीप्रमाणे पालन करण्याचे आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय 30 सप्टेंबरपर्यंत बंदच राहणार आहेत. याशिवाय लाऑकडाऊनचे सर्व नियम, जमावबंदीचा आदेश पूर्वीप्रमाणेच कायम राहणार आहे. पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येणे यावर तसेच दुचाकीवर दोनपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र बसणे यावर बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
मंगल कार्यालयातील विवाह समारंभ आणि अंत्यविधीला पूर्वीप्रमाणेच अनुक्रमे 50 आणि 20 जणांना प्रवेश देण्यात येणार आहे.