कोपरगाव : सासरी नांदत असताना नवीन घर घेण्यासाठी माहेरहून दोन लाख आणावेत, यासाठी विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला घराबाहेर काढले. ही घटना विवाहितेच्या सासरी मोरपंख सोसायटी चिखली पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे २४ जून, २०२० पासून २० ऑगस्ट, २०२० दरम्यान घडली आहे.
या प्रकरणी हिना इरफान तांबोळी (वय २५, रा.मोरपंख सोसायटी चिखली, पिंपरी चिंचवड, पुणे ह.रा.इंदिरानगर कोपरगाव) हिच्या फिर्यादीवरून इरफान रफीक तांबोळी, फहमीदा रफीक तांबोळी, रफिक सुलतान तांबोळी (तिघे रा.चिखली पिंपरी चिंचवड, पुणे) सना आसीफ तांबोळी, राजू अब्बास तांबोळी, अनिसा राजू तांबोळी (रा. नाशिक), साहीस्ता आसीफ तांबोळी (रा.नारायणगाव, पुणे) यांच्यावर मंगळवारी (दि.६) कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.