यावेळी पत्रकार आबिद दुलेखान, खान अंजुम खलील उपस्थित होते. सर सय्यद अहमदखान उर्दू प्राथमिक शाळेमध्ये नवीन शैक्षणिक वर्षामध्ये प्रवेश घेतलेल्या पहिलीतील विद्यार्थ्यांचे स्वागत प्रसंगी संस्थेच्या सदस्य शेख महेनाज अ. सलाम, मुख्याध्यापिका सय्यद अफसाना इब्राहीम, मातोश्री उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक शेख जमीरअहमद इस्माईल यांच्यासह पालक उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगसह शासन नियमांचे पालन करण्यात येऊन सदरचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रमुख कार्यवाह शेख अब्दुस सलाम होते. याप्रसंगी खान अंजुम खलील म्हणाल्या, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने ऑनलाईन वर्ग सुरु झाले आहेत. त्यामुळे शिक्षकांबरोबरच पालकांनीही घरी बसून विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा सुरु आहे, याची माहिती मिळत आहे. शिक्षक करत असलेल्या उपक्रमांची पालकांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे.
कार्यक्रमाचे प्रास्तविक शबाना बाजी यांनी, तर सूत्रसंचालन जाहेदा बाजी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जोहरा बाजी, परवीन बाजी, साकीब सैय्यद यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार समीना बाजी यांनी मानले.
----------
फोटो - २९ उर्दू स्कूल
सर सय्यद अहमदखान उर्दू शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत गणवेश, शैक्षणिक साहित्य व मास्क देऊन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. अब्दुस सलाम, आबीद दुलेखान, खान अंजुम खलील, शेख जमीर, अफसाना बाजी, साकिब सय्यद आदी.