शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात सोमवारी (दि. २९) राष्ट्रीय गणित दिवसानिमित्त आयोजित वेबिनारमध्ये ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड होते. विभागप्रमुख प्रा. सुरेश गुडदे, प्रा. उत्तम खर्डे, समन्वयक प्रा. श्वेता बिबवे आदी उपस्थित होते.
डॉ. टकले म्हणाले की, तंत्रज्ञान विकसित करायचे असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी गणित विषयाचा अभ्यास करून त्यात संशोधन केले पाहिजे. तंत्रज्ञान व गणित यांची सांगड घालून गणितातील क्लिष्ट गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. पायथन ही संगणकाची भाषा असून, समजण्यासाठी व शिकण्यासाठी अत्यंत सोपी असल्यामुळे त्या माध्यमातून प्रत्येकाने गणित विषयातील अवघड गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. भारतीय गणितज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी महाविद्यालयामध्ये २२ डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिवस साजरा केला जातो. विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते; मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गणित विभागाने ऑनलाइन पद्धतीने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे प्राचार्य डॉ. गायकवाड यांनी सांगितले.
प्रास्ताविक विभागप्रमुख प्रा. सुरेश गुडदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. क्यु. ए.चौकी यांनी केले. प्रा.उत्तम खर्डे यांनी आभार मानले. विविध महाविद्यालयांतील ११० विद्यार्थी व प्राध्यापक यांनी या वेबिनारमध्ये सहभाग नोंदवला. आयोजनासाठी विभागातील प्रा. श्वेता बिबवे, प्रा. अमोल शेळके, प्रा. निकीता वर्पे, प्रा.पल्लवी शेटे यांनी परिश्रम घेतले.